स्पोर्ट्सच्या महत्वाच्या बातम्या सर्वांत जलद वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारतीय क्रिकेट संघाचे हे 3 दिग्गज खेळाडू लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती होऊ शकतात.


आपल्या भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. अनेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र यातील मोजकेच खेळाडू हे स्वप्न पूर्ण करतात. टीम इंडियामध्ये स्पर्धा सतत वाढत आहे, तरुण देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत, ज्यामुळे आगामी काळात काही मोठ्या क्रिकेटपटूंची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.

आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा भाग आहेत. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेबऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहेत. सध्याच्या भारतीय एकदिवसीय संघाची कामगिरी पाहता या खेळाडूंना एकदिवसीय संघात पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत या दिग्गज खेळाडूंनी खेळाच्या या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली पाहिजे.

भारतीय क्रिकेट संघाचे हे 3 दिग्गज खेळाडू लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

अजिंक्य रहाणे: भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यावर आहे. रहाणेने एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2011 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रहाणेने फेब्रुवारी 2018 मध्ये सेंच्युरियन मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला एकही एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. रहाणेने भारतीय संघासाठी एकूण 90 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

new google

आता त्याच्याकडे कसोटी विशेषज्ञ म्हणून पाहिले जाते. टीम इंडियाच्या मधल्या फळीत त्याच्या जागी सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि इशान किशन या फलंदाजांनी चांगली कामगिरी करून आपली जागा पक्की केली आहे. हे पाहता रहाणे आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्वचितच खेळतानादिसण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटमध्येही हे वर्ष त्याच्यासाठी खूपच निराशाजनक ठरले आहे. 2021 मध्ये रहाणेने 19.57 च्या सरासरीने  धावा केल्या आहेत.

इशांत शर्मा: उंच वेगवान गोलंदाज असलेल्या इशांत शर्माने भारतीय संघासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. आणि तो अजूनही भारतीय कसोटी संघाचा नियमित भाग आहे. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो विशेष यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे 2016 पासून इशांतने भारतीय संघासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही.

2008 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या दिल्लीच्या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघासाठी एकूण 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 115 विकेट्स घेतल्या आहेत.

खेळाडू

दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह सारखे युवा वेगवान गोलंदाज संघात सामील झाल्याने इशांतला भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करणे अशक्य आहे. इशांतला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले स्थान कधीच पक्के करता आले नाही, त्यामुळे आता या छोट्या फॉरमॅटमध्ये स्थान मिळवणे त्याच्यासाठी खूप कठीण काम आहे.

चेतेश्वर पुजारा: भारतीय कसोटी संघातील सर्वात प्रमुख सदस्यांपैकी एकअसलेला अनुभवी उजव्या हाताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा नेहमीच कसोटी क्रिकेटपटू म्हणून पाहिला जातो. मात्र त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याला भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधीही मिळाली.

मात्र पुजाराला या संधीचा फारसा फायदा उठवता आला नाही. 2013 मध्ये भारतीय संघाकडून वनडे पदार्पण करणाऱ्या पुजाराला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ 5 वनडे खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये पुजाराला केवळ 51 धावा करता आल्या. स

पुजाराने 2014 साली बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याला अजून दुसरी संधी मिळालेली नाही. युवा खेळाडूंची दमदार कामगिरी पाहता एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुजाराला आणखी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट होते. अशा स्थितीत या अनुभवी फलंदाजाने खेळाच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करावी असचं म्हणावे लागेल.


====

स्पोर्ट्सच्या इतर बातम्या वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here