आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

एकाही व्यक्तीच्या हत्या न करता या डॉनने कित्येक वर्ष मुंबईवर राज्य केलं होत..


मुंबई मायानगरी त्यावेळी झपाट्याने वाढायला सुरवात झाली होती. कापडापासून ते सर्व प्रकारचे कारखाने मुंबईत वाढू लागले होते. मुंबई बेटांमधून परदेशातून मालाची आवक झपाट्याने होत होती. देशाच्या विविध भागातून लोक रोजगारासाठी मुंबईत येऊ लागले.

याच काळात तामिळनाडूतील एका 8 वर्षाच्या एका मुलाने वडिलांचे बोट धरून मुंबई शहरात प्रवेश केला. त्याच्या निरागस डोळ्यांत श्रीमंत होण्याची चित्रे दिसत होती. मुंबईत त्याने सायकल दुरुस्ती करण्यापासून आपल्या कामाला सुरवात केली तोच त्याचा प्रवास मुंबईचा डॉन होण्यापर्यंत पोहचला होता.

 ही कहानी आहे आकिब हुसेन उर्फ ​​हाजी मस्तानची.  

1 मार्च 1926 रोजी तामिळनाडूमध्ये हाजी मस्तान याचा जन्म पणाईकुलम येथे झाला. वर्ष होते 1934 मुंबई झपाट्याने देशाची व्यापारी राजधानी बनत चालली होती. भारतातील प्रत्येक भागातील लोक मुंबईकडे वळत होते. त्याचवेळी हाजी मस्तान हे त्याचे वडील हैदर मिर्झा यांच्यासोबत पणाईकुलमहून मुंबईत आला.

दोघेही मुंबईतील क्रेफोर्ड रोड येथे सायकल दुरुस्तीचे काम करू लागले. दिवसभर तिथे काम करूनही  मेहनताना फारच कमी मीळत असे, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह क्वचितच होत होता. तरीही, दोघांनी तिथे 10 वर्षे काम केले. पण या दहा वर्षांत हाजी मस्तानने आपल्यातल्या रंगीबेरंगी स्वप्नांना कोमेजून जाऊ दिले नाही.

डॉन

हाजी मस्तान पुढे बॉम्बे डॉकमध्ये काम करत असताना त्याने व्यापा-याना खूप समाधन दिले. त्या दिवसांत, व्यापारी गुप्तपणे परदेशी ट्रान्झिस्टर, सोने-चांदी आणि परदेशी घड्याळांची तस्करी करत. मस्तान त्यांचे सामान गोदीतून सुखरूप बाहेर देशी काढू लागला. त्या बदल्यात त्याला चांगले पैसे मिळायचे. मस्तानबद्दल असं म्हटलं जातं की, तो मोठ्या प्रामाणिकपणे काळा धंदाही करायचा आणि पैशासाठी कधीही कोणाची ह्त्या त्याने केलि नाही हे विशेष.

त्याच्या प्रामाणिकपणाचा एक किस्सा सर्वश्रुत आहे. त्यानुसार एकदा एका व्यावसायिकाला हाजी मस्तानच्या मदतीने सोन्याची तस्करी करायची होती. त्याने हाजी मस्तानला सोन्याची काही बिस्किटे दिली आणि लपून तो गोदीतून बाहेर  नेऊ लागला. हाजी मस्तान सुखरूप बाहेर पडला मात्र व्यावसायिकाला अटक झाली  शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा हाजी मस्तानने त्याला संपूर्ण सोने परत केले होते.

26 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. खबरदारी म्हणून सर्व गुन्हेगारांना तुरुंगात टाकले जात होते. हाजी मस्तानलाही तुरुंगात टाकण्यात आले.

त्याने सुमारे 18 महिने तुरुंगात काढले. अखेर त्याने गुन्हेगारी जगताला अलविदा करण्याचे ठरवले. तुरुंगातून सुटल्यानंतर तो हजला गेला होता. हज करून परतल्यावर त्याला ‘हाजी मस्तान’ हे नाव पडले. हजहून परतल्यावर हाजी मस्तानने तस्करीचा धंदा सोडून कायदेशीर कामात पैसे गुंतवायला सुरुवात केली. यासोबतच त्यानी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली.

परतु, मुंबईतील गरिबांसाठी विशेषतः दलित आणि मुस्लिमांसाठी ते निश्चितच मसिहा म्हणून उदयास आला होता. अखेर ९ मे १९९४ रोजी त्याचा प्रवास संपला. त्याने आपल्या संपूर्ण जीवनात कधीही कुणालाही मारले नाही असं म्हटलं जात. तरीही तो संपूर्ण मुंबईवर राज्य करायचा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here