आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

खलनायकाची भूमिका करूनही नायक-नायिकेला स्पर्धा देणारी अभिनयविश्वातील अभिनेत्री नादिरा !


भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीला  पुरुषच स्त्रियांचा अभिनय करत असत. मग हळूहळू समाजात जागृती झाली आणि महिलाही चित्रपटात काम करू लागल्या. पण तरीही चित्रपटांमध्ये ‘अबला नारी’ म्हणूनच महिला दाखवल्या जात होत्या.   कोनतीही अभिनेत्री त्याकाळी बोल्ड किंवा खलनायकी भूमिका करायला तयार नव्हती.

अशा परिस्थितीत, एक धाडसी पाऊल उचलत, एका अभिनेत्रीने स्वत: ला व्हॅम्प म्हणजेच खलनायकाच्या भूमिकेत अशाप्रकारे साकारले की लोक अजूनही तिला लक्षात ठेवतात. तिचे खरे नाव नादिरा ! ती खरतर फ्लॉरेन्स इझेकिएल होती. चला तर जाणुन घेऊया बॉलिवूडच्या या विस्मृतीत गेलेल्या अभिनेत्रीबद्दल…

Nadira Facts: बॉलीवुड में इस एक्ट्रेस ने सबसे पहले खरीदी थी Rolls Royce कार, आखिरी वक्त में रह गई थीं अकेली Nadira First Actress Who Bought Rolls Royce Car Know Unknown Facts

new google

नादिरा ही 50-60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती, जी बहुतेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसली होती. तीनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘आन’, ‘श्री 420”, ‘जुली’, ‘सिपस्लर’,  ‘पाकीजा’ ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘अमर अकबर अँथनी’ ‘हंस्ते जख्म’ यांसारख्या एक से एक चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. ‘ज्युली’ चित्रपटासाठी नादिराला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देखिल मिळाला होता.

नादिराचे कुटुंब उदरनिर्वाहाच्या शोधात बगदादहून मुंबईत आल्याचे सांगितले जाते. नादिरा ज्यू धर्माची होती. दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम यांच्यामुळे नादिराला पहिला ब्रेक मिळाला. मेहबूब खान देशातील पहिल्या रंगीत चित्रपट ‘आन’साठी अभिनेत्रीच्या शोधात होते. यासाठी त्याच्या पत्नीने नादिराचे नाव सुचवले आणि तिला आपल्या यशस्वी करिअरचा पहिला टप्पा सापडला.

नादिरा

‘आन’ हिट ठरला आणि त्यानंतर नादिराच्या करिअरला सुरुवात झाली, पण तिच्या आईला नादिराचे चित्रपटातील काम आवडले नाही. तिला वाटले की ही लग्न करणार नाही आणि तिला ज्यू देवस्थानांमध्ये पूजा करू देणार नाही. पण घरची परिस्थिती पाहून नादिराने काम सुरूच ठेवले. काही काळानंतर नादिराला राज कपूरचा ‘श्री 420’ चित्रपट मिळाला. यामध्ये तिने पहिल्यांदा व्हॅम्पची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिचा अभिनय लोकांना आवडला पण आता नादिराला चित्रपटात हिरोईन म्हणून कोणी साईन करायला तयार नव्हते.

अशा प्रकारे नादिराला जास्त नकारात्मक भूमिका मिळू लागल्या, नादिराने त्या अशा प्रकारे साकारल्या की एका फेरीत तिला हिरो-हिरॉईनपेक्षा जास्त कमाई होऊ लागली. 1949 मध्ये त्यांना दरमहा रु.1200 पगार मिळत होता, जो हळूहळू वाढून 3600 रुपये झाला. एवढी मोठी रक्कम घेऊन ती घरी पोहोचत होती. बरं, पैसा आला की जीवनशैलीही बदलावी लागली. त्यावेळी तिने ‘रोल्स रॉइस’ खरेदी केली. ही आलिशान कार विकत घेणारी ती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री असल्याचे बोलले जाते.

नादिराने भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली पण वैयक्तिक आयुष्यात तिला फारशी शांतता मिळाली नाही. तिचे लग्न झाले तरी ती फार काळ टिकले नाही, काही लोक दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणत पण तिने शेवटचे दिवस एकट्याने घालवले. मरेपर्यंत तिची काळजी घेणारे तिचे घरचेच होते. नादिराचा अभिनय आणि तिने साकारलेली खलनायकाची भूमिका आजही लोकांना तिचे कौतुक करण्यास भाग पाडते..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here