स्पोर्ट्सच्या महत्वाच्या बातम्या सर्वांत जलद वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या सुरक्षा रक्षकाला देतात तब्बल एवढा पगार, आकडा ऐकून बसेल धक्का..!


भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड स्टार अनुष्का शर्मा यांची जोडी भारतातील सर्वाधिक पसंतीची जोडी आहे. त्या दोघांचेही चाहते मोठ्या प्रमाणात आहेत.. विराट हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला व्यक्ती आहे. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

दोघेही अनेकदा त्यांच्या चाहत्यांसोबत चांगल्या गोष्टी शेअर करतात. प्रत्येक सेलिब्रिटी जोडप्याप्रमाणे विराट-अनुष्का देखील त्यांच्या सुरक्षेबाबत खूप जागरूक आहेत. त्यामुळेच त्यांनी सोनू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश सिंगला आपला अंगरक्षक म्हणून ठेवले आहे. आणि यासाठी ते सोनुला खूप मोठी रक्कम देतात.

अनुष्का शर्मा

new google

बहुतांश सार्वजनिक ठिकाणी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा त्यांच्या अंगरक्षक सोनूसोबत दिसत आहेत. या कामासाठी अनुष्का सोनूला मोठी रक्कम देते.

डीएनएच्या रिपोर्टनुसार अनुष्का शर्मा सोनूला वार्षिक 1.2 कोटी म्हणजेच 10 लाख रुपये महिना एवढे  मानधन देते.   सोनू अनेक वर्षांपासून अनुष्का शर्मासोबत आहे. 2017 मध्ये विराट कोहलीसोबत अनुष्का शर्माच्या लग्नापूर्वी ते एकत्र होते. कोहलीची स्वतःची सुरक्षा आहे,परंतु तरीही  कधी गरज पडल्यास अनुष्काचा सुरक्षारक्षक सोनू विराटला सुद्धा सुरक्षा पुरवतो.

सोनू विराट आणि अनुष्काच्या घरातील सदस्यासारखा झाला आहे. अनुष्का शर्मा गरोदर असताना सोनूने तिची चांगली काळजी घेतली. तेव्हा सोनू अनुष्का शर्माच्या आसपास पीपीई किट घातलेला दिसत  होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला.

दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीतील टस्कनी येथे एका खाजगी समारंभात लग्न केले. दोघांना एक मुलगी वामिका आहे. लोकांना वामिकाचा चेहरा अजून पाहता आलेला नाही कारण विरुष्काने आपल्या मुलीला याची माहिती मिळेपर्यंत सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडविरुद्धची मायदेशातील मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहे. या दौऱ्यावर (IND vs SA) भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भाग घ्यायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार्‍या कसोटी सामन्याने होईल.


====

स्पोर्ट्सच्या इतर बातम्या वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here