आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी असलेल्या वादामुळे कुलदीप यादवला मुद्दामसंघात स्थान दिले नाही, कुलदीपच्या प्रशिक्षकाचा मोठा आरोप..!


डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव अलीकडेपर्यंत भारतीय संघाच्या गोलंदाजीचा एक महत्त्वाचा सदस्य होता. 2017 ते 2020 पर्यंत कुलदीपने युझवेंद्र चहलसह टीम इंडियाला अनेक महत्त्वाचे यश मिळवून दिले. मात्र खराब फॉर्ममुळे कुलदीप बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

आता त्याचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुलदीपला फॉर्म सिद्ध करण्याची एकही संधी दिली गेली नाही.

स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही: कपिल देव पांडे

कुलदीप यादव

new google

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटशिवाय कुलदीपने कसोटी क्रिकेटमध्येही खूप नाव कमावले आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये ५ बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मात्र हा डावखुरा चायनामन फिरकीपटू खराब फॉर्ममुळे काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे.

आयपीएलमध्येही कुलदीप यादवला काही विशेष संधी मिळत नाहीयेत. त्याचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुलदीपचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांचे म्हणणे आहे की कुलदीप यादव चांगली कामगिरी करत होता पण असे असूनही त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.

कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी त्याची काही समस्या होती आणि त्यामुळेच त्याला बाजूला करण्यात आले. पांडेच्या म्हणण्यानुसार, कुलदीपला दुखापत होण्यापूर्वीच संघातून वगळण्यात आले होते.

न्यूज18 शी संवाद साधताना कपिल देव पांडे म्हणाले,

अश्विन (रविचंद्रन अश्विन) आणि जडेजा (रवींद्र जडेजा) खूप चांगले फिरकीपटू आहेत पण कुलदीप यादव कामगिरी करत असतानाही त्याला संधी मिळाली नाही. त्यावेळी कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील वादामुळे तो बाजूला झाला होता. माझ्या मते तो दुखापतीपूर्वीच वगळला होता.

काही लोक म्हणतात की कुलदीप यादव फॉर्मात नव्हता पण त्याला किती संधी मिळाल्या ते सांगा. तो विकेट घेत होता. तुम्ही सहा चेंडूत सहा विकेट घेऊ शकत नाही. तो कर्णधार आणि प्रशिक्षकाचा पर्याय नव्हता असे दिसते आणि त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात आले आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here