आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

के. एल. राहुलच्या ताबडतोब फलंदाजीमुळे भारताच्या या स्टार खेळाडूंचे करिअर धोक्यात आलंय..


आपल्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर सध्या केएल राहुलने भारतीय संघातील सलामीवीर म्हणून आपल स्थान पक्क केलंय.केएल राहुलने भारतासाठी अनेक दीर्घ खेळी खेळल्या आहेत. यामुळे त्याने सलामीवीर म्हणून संघात आपले स्थान पक्के केले आहे. राहुलच्या चांगल्या प्रदर्शनाने मात्र भारतीय संघातील काही खेळाडूंचे करिअर धोक्यात आलंय. त्यांचे संघात पुनरागमन करण्याच स्वप्न साकार होण्याची शक्यता कमीच वाटतेय. त्यातीलच हे काही खेळाडू.

 शिखर धवन: भारतीय संघात गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला शिखर धवन हा एक घातक शैलीचा फलंदाज आहे.    सामन्यात सलामीला येऊन शिखर धवन गोलंदाजावर दबाव आणण्यासाठी ओळखला जातो. सध्या गब्बरची बॅट बराच काळ शांत आहे, त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत त्यामुळे तो टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर पडत आहे.

राहुल

त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने शानदार खेळी करत टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे. याच शिखर धवनच्या नावाचा आफ्रिका मालिकेतही समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राहुल असेपर्यंत गब्बरला संघात जागा मिळणे कठीण वाटतंय.

  पृथ्वी शॉ: युवा फलंदाज पृथ्वी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. सुरवातीच्या काही सामन्यात चमकदार कामगिरी करून त्याने आपल्या करिअरची सुरवात धडाक्यात केली होती. पृथ्वी शॉ हा सचिनसारखा लहान उंचीचा खेळाडू आहे.जेव्हा तो आक्रमक फलंदाजी करतो तेव्हा गोलंदाजांना त्याला रोखणे कठीण जाते. शॉने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु हा फलंदाज गेल्या एक वर्षापासून भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. शॉने भारतासाठी 5 कसोटी सामन्यांमध्ये 339 धावा केल्या आहेत ज्यात एका शतकाचा समावेश आहे. केएल राहुलला कसोटी संघात कायमस्वरूपी स्थान मिळाल्याने शॉचे पुनरागमन करणे कठीण झाले आहे.

मुरली विजय: एक काळ असा होता जेव्हा मुरली विजय भारतासाठी सलामी देत ​​असे पण खराब फॉर्ममुळे मुरली विजयला संघाबाहेर व्हावे लागले. मुरली विजयने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघाच्या 61 कसोटी सामन्यांमध्ये 3982 धावा केल्या. केएल राहुल सध्या फॉर्मात आहे आणि टीम इंडियाला जबरदस्त धावा देत आहे. अशा परिस्थितीत  संघात पुनरागमन करायचं झालं तर विजयला एखादा चमत्कारच करून दाखवाव लागेल.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here