आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आजच्याच दिवशी ऑस्ट्रोलीयाविरुद्ध कसोटी सामन्यात भारतीय संघ केवळ 36 धावात गारद झाला होता.


भारतीय क्रिकेट संघातील यश-अपयशाचे अनेक किस्से लोकांना माहिती आहेत. सध्या आपला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. क्रिकेट रसिक या दौऱ्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे लक्ष ठेऊन आहेत. पण आम्ही तुम्हाला नेमका गेल्या वर्षी आजच्याच  दिवशी भारतीय संघाने केलेला एक पराक्रम सांगणार आहोत.

आज 19 डिसेंम्बर. नेमक्या याच दिवशी गेल्यावर्षी (19 /12/2020) भारतीय संघ अवघ्या 36 धावात गुंडाळल्या गेला होता. एडिलेड येथे भारत आणि आस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना होता.भारताच्या पहिल्या डावात एकूण  244 धावा केल्या होत्या.

भारती

यात कर्णधार विराट कोहलीचे 74 धावांचे योगदान बहुमूल्य होते .विशेष म्हणजे ऑस्ट्रोलीया संघाला भारतीय गोलंदाजांनी 191 धावातच गुंडाळले होते. अश्विन , बुमराह यादव यांनी कमाल केली होती.भारताला आघाडी मिळाल्याने सामना अर्थातच भारताच्या बाजूने झुकला होता. भारत हा सामना सहज जिंकेल असचं काहीस चित्र होत.

…पण सामन्यांच्या तिसऱ्या दिवशी जे झाले ते अकल्पित होते. कांगारुंच्या गोलंदाजीपुढे भारतीय संघ दुसऱ्या डावात इतका ढेपाळला की, यावर कुणाचा विश्वासच बसला नाही. भारताच्या संघाने कांगारू गोलंदाजापुढे अक्षरशा नांगी टाकली. संपूर्ण भारतीय संघ मिळून केवळ 36 धावाच करू शकला. आणि अर्थातच भारताला एका मोठ्या  पराभवाला सामोरी जाव लागलं.

आजच्याच दिवशी घडलेला हा नाट्यमय सामना  भारतीय प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवनारा सामना ठरला होता..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here