आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

17 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या अस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा आतापासूनच प्रकाशझोतात असून 9 वेळा आस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचच्या सहभागाबाबत चर्चा सुरू असतानाच तो या स्पर्धेत खेंळणार असल्याने 10 व्यादा तो हा किताब जिंकणार का? या उत्सुकतेपोटी क्रीडा जगत या स्पर्धेकडे पाहू लागले आहे.असे असले तरी 23 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनपद पटकावणारी सेरेना विल्यम्स खेंळणार नसल्याने तिचे चाहते नाराज आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी दोन्ही लसी घेतलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले मात्र जोकोविचने शेवटपर्यंत याबाबत सार्वजनिक खुलासा न केल्याने संभ्रम होता.सिडनीत गेल्या महिन्यात झालेल्या एटीपी कप स्पर्धेत जोकोविच सहभागी होता.

जोकोविचचा प्रतिस्पर्धी राफेल नदाल देखील या स्पर्धेत असल्याने या दोन खेळाडूंसाठी जागतिक विक्रम (वर्ल्ड रेकॉर्ड) करण्याची संधी निर्माण झाली आहे.तसेच रॉजर फेडररला मागे टाकण्याची संधी आहे.

new google

ऑस्ट्रेलियन ओपन

या तिन्ही खेळाडूंनी आजतागायत सर्वाधिक 20-20 वेळा ग्रँड स्लॅम पटकावले आहे.दुखापतीमुळे फेडरर यावेळी या स्पर्धेपासून दूर आहे. त्यामुळे नदाल व जोकोविच जवळ ही स्पर्धा जिंकून सर्वाधिक ग्रँड स्लॅम पटकावण्याची संधी आहे, त्यासाठी टेनिस दर्शक या स्पर्धेकडे लक्ष लावून आहेत.

याशिवाय अमेरिकन ओपन 2019 ची चॅम्पियन बियांका आंद्रेस्कु ही देखील आगामी काळात टेनिस कोर्टवर दिसणार नाही.कॅनडाच्या या 21 वर्षीय खेळाडूने ट्विटरवर स्पष्ट केले आहे की, कोरोना मुळे आपण कितीतरी आठवडे विलगिकरणात राहिलो, त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळण्यास तयार नाही.तिची आजी कोरोना मुळे अति दक्षता विभागात होती, त्यामुळे आपल्याला देखील तेथे रहावे लागले होते याचा खोल परिणाम आपल्या मनावर झाल्याचे या टेनिस सुंदरीने सांगितले.

विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी 19 वर्षाची असताना बियांका ने तिची आदर्श असलेली सेरेना विल्यम्स हिचाच पराभव करून यूएस ओपनचा किताब जिंकला होता.ती तेव्हा चौथ्या रँकिंगवर पोहचली होती. टेनिस दर्शकांचे यावेळी दुर्देव हे की या दोघी जानेवारीत सुरू होणाऱ्या अस्ट्रेलियन ओपन मध्ये नसतील.पायाला असलेल्या दुखापतीने त्रस्त सेरेना ने ही स्पर्धा न खेळण्याचे ठरविले आहे.तिने आजतागायत 7 वेळा आस्ट्रेलियन ओपन चा ‘किताब जिंकला आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here