आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
2021मध्ये हे स्टार क्रिकेटपटू झाले वडील,चार भारतीय खेळाडूंचाही आहे समावेश…!
2021च्या वर्षात अनेक क्रिकेटपटूच्या कामगिरीने दर्शक खुश आहेत, तर क्रिकेट शिवाय आपल्या खाजगी आयुष्यात देखील हे क्रिकेटपटू आनंदी असल्याचे आपण बघत आलोत, कोणी बोहल्यावर चढलेत,तर कोणी आपल्या मुलांचे बाबा झालेत. 2021 मध्ये जगभरातील 9 क्रिकेट खेळाडूंच्या घरात गोंडस बाळांनी जन्म घेतला आहे.यात 4 भारतीय क्रिकेटपटू आहेत.
उमेश यादव: भारतीय संघातील फास्ट बॉलर उमेश यादव याच्या घरात तो आस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याची पत्नी तान्या वाधवा हिने 1 जानेवारी 2021 ला मुलीला जन्म दिला, याची माहिती उमेश ने ट्विटरवर दिली होती.
एरोन फिंच: ऑस्ट्रेलियन खेळाडू एरोन फिंच हा देखील सप्टेंबर महिन्यात बाप बनला.त्याची पत्नी एमी हिला मुलगी झाली.या दाम्पत्यांसाठी ही आनंदाची बाब होती, मुलीचे नाव इस्थर केट ठेवल्याची माशीती त्याने सोशल मीडियावर दिली होती.

पॅट कमिन्स: आस्ट्रेलियाचाच खेळाडू फास्टर बॉलर पॅट कमिन्स देखील यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलीचा पिता बनला. विशेष म्हणजे त्याची सहचारिणी बेकी बोस्टन हिने 8 ऑक्टोबर ला बाळाला जन्म दिला, कोरोना मुळे हे दोघे विवाह करू शकले नाहीत.मुलीचे नाव त्यांनी एलबी बोस्टन ठेवले.
मेगान स्कट: हे नाव आहे महिला क्रिकेटमधील आहे.आस्ट्रेलिया महिला संघाची ही खेळाडू यावर्षी मुलीची आई बनली. तिची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे.स्कट व तिची लेस्बियन पार्टनर जेस या दोघी ऑगस्ट महिन्यात आई बनल्या.सी-सेक्शन मार्फत तिने मुलीला जन्म दिला तिचे नाव राईल ठेवण्यात आले, स्कट ही जलदगती गोलंदाज आहे.
हरभजनसिंग: भारतीय क्रिकेट संघातील परिचित खेळाडू हरभजनसिंग देखील यावर्षी बाबा झाला.जुलै महिन्यात त्याला मुलगा झाला त्याची पत्नी गीता बसरा व त्याचे हे दुसरे मूल आहे.त्याचे नाव जीवन ठेवले आहे, या दोघांना 5 वर्षाची मुलगी हिनाया ही आहे.
जोस बटलर: इंग्लड क्रिकेट संघातील विकेट किपर असलेला जोस बटलर हा देखील यावर्षी दुसऱ्यांदा बाबा बनला.त्याची पत्नी लुईसने 5 सप्टेंबर ला गोंडस मुलीला जन्म दिला.तिचे नाव मॅगी ठेवले आहे. 2019 मध्ये देखील त्याला मुलगी झाली होती तिचे नाव जॉर्जिया रोज आहे.
विराट कोहली: भारतीय क्रिकेट संघाचा लोकप्रिय कर्णधार.त्याची पत्नी अनुष्का ही अभिनेत्री. या दोघांनी विवाह केल्यावर त्याच्या घरात यावर्षी पाळणा हलला.11 जानेवारी 2021 ला त्यांना मुलगी झाली, तिचे नाव वामिका असे आहे.
भुवनेश्वर कुमार: भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा देखील यावर्षीच बाबा झाला.त्याची पत्नी नुपूर नागर ही 24 नोव्हेंबरला एका मुलीची आई झाली.
=
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा
या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यां