आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारत

विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात आतापर्यंत या ३ खेळाडूंनी खोऱ्याने धावा काढल्यात..


क्रिकेटच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात नेहमीच रोमांचक सामना होत आला आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकाहून एक सरस सामने झाले आहेत.ज्यामध्ये भारत आणि आफ्रिका संघ जेव्हा कसोटी सामन्यात आमनेसामने येतात तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंवर वेगळ्याच प्रकारचे दडपण दिसून येते.

26 डिसेंबरपासून पुन्हा एकदा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यावेळी भारतीय संघ तिथे पहिली कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण आफ्रिकन संघातील खेळाडूंना हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करणार नाही.

याच दौऱ्याच्या निमिताने आम्ही आज तुम्हाला त्या 3 स्टार खेळाडूंची नावे संगनार आहोत ज्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यांत सर्वाधिक धावा काढल्यात..

new google

भारत

  वीरेंद्र सेहवाग (१३०६ धावा): भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेहमीच वेगळा फॉर्म पाहायला मिळतो. सेहवागने आपल्या कारकिर्दीत आफ्रिकेविरुद्धच्या 15 कसोटी सामन्यांच्या 26 डावांत 50.23 च्या सरासरीने 1306 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

सेहवागच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 104 सामने खेळले आहेत आणि 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 23 शतके आणि 32 अर्धशतकेही केली आहेत.

एबी डिव्हिलियर्स (1334 धावा) दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार आणि मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलियर्सचा कसोटी क्रिकेटमध्येही मोठा विक्रम आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीत भारताविरुद्धच्या 20 कसोटी सामन्यांच्या 35 डावांमध्ये 39.24 च्या सरासरीने 1334 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

या खेळाडूने आपल्या कसोटी कारकिर्दीत 114 सामने खेळले असून 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 22 शतके आणि 46 अर्धशतके झळकावली आहेत.

 हाशिम आमला (१५२८ धावा): आफ्रिका संघाचा आणखी एक माजी कर्णधार आणि तेजस्वी फलंदाज हाशिम आमला याच्या नावावर कसोटी फॉर्मेटमध्ये मोठा विक्रम आहे. अमलाची विकेट कोणत्याही परिस्थितीत मिळवणे गोलंदाजांसाठी सोपे काम नव्हते. भारताविरुद्धही हाशिम आमलाने आपला सर्वोत्तम फॉर्म दाखवला आहे. ज्यामध्ये त्याने 21 कसोटी सामन्यांच्या 37 डावांमध्ये 43.66 च्या सरासरीने 1528 धावा केल्या आहेत.

यादरम्यान अमलाच्या बॅटने 5 शतके आणि 7 अर्धशतकेही झळकली आहेत. अमलाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 124 सामने खेळले आहेत आणि त्याच्या खात्यात 46.64 च्या उत्कृष्ट सरासरीने 9282 धावा जमा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 28 शतके आणि 41 अर्धशतके केली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here