आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===


काय आहे हे प्रकरण? ज्यावेळी अभिनेता शाहरुख खान हा आपला चित्रपट झिरो चे प्रमोशन करण्यात व्यग्र होता. त्यावेळेचा हा किस्सा2018 चा.त्याची पुन्हा चर्चा यासाठी की, रविवारी म्हणजे काल-परवा विरुष्का एम्पायर नावाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

ज्यावेळी 2018 मध्ये झिरो चित्रपटाचे इन्व्हेंट च्या वेळी अनुष्का शर्मा,कतरीना कैफ त्याच्या समवेत हजर होते.त्यावेळी मीडियाचे लोक देखील तेथे हजर होते. या चित्रपटाची थीम वेगळी होती, पण शाहरुख क्रिकेट खेळाचा चाहता, त्यात मैदानावरील विराट सोबत चित्रपटात काम करणाऱ्या अनुष्का शर्माची लव्ह स्टोरी चर्चेत.चित्रपटाचे नाव झिरो, ज्याचा क्रिकेटशी नेहमी संबंध. अशावेळी पत्रकारांकडून तसेच प्रश्न येणे स्वाभाविक होते.

शाहरूख खान

new google

त्यावेळी हे तिघे उपस्थित असताना एका पत्रकाराने प्रश्न केला की, जर तुम्हाला या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल तर कोणता क्रिकेटपटू शून्यावर म्हणजेच झिरो वर आऊट व्हावा असे तुम्हाला वाटते?

त्यावेळी किंग खान ने अतिशय मजेशीर उत्तर दिले.आधी तर त्याने सांगितले की, मी जेथे बसलेला आहे तेथे भारतीय क्रिकेट बाबत काहीही वाईट बोलू शकत नाही.तुम्ही हा इथे प्रश्न कसा काय विचारू शकता? येथे माझ्या बाजूला अनुष्का कडे बोट दाखवून मिसेस क्रिकेटर बसलेली आहे.तुम्हाला लाज कशी नाही वाटत?काहीही चुकीचे बोललो तर मागून पाठीवर माझ्या मार बसेल असे हसून शाहरुख ने सांगितले तेव्हा उपस्थित अनुष्का, व कॅटरिना ला देखील हसू आवरले नाही.थ्रो बॅक व्हिडीओ म्हणून शेअर केलेल्या या व्हिडीओला ‘जेव्हा अनुष्का शर्मा ला शाहरुख खान ने म्हटले मीसेस क्रिकेटर.’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

17 डिसेंम्बर 2017ला विराट-अनुष्का यांचा शाही विवाह झाला होता.त्यानंतर वर्षभराने झिरो चित्रपट प्रदर्शित झाला.यात शाहरुख ची एका ठेंगण्या व्यक्तीची तर अनुष्काची दिव्यांग वैज्ञानिक म्हणून भूमिका होती.विशेष म्हणजे शाहरुख आयपीएल सीपीएल शी निगडित आहे.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here