आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आता महिलांचेही आयपीएल होणार? लवकरच होऊ शकते अधिकृत घोषणा, महिला खेळाडूही आहेत उत्सुक…


क्रिकेटमध्ये आयपीएलच्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर आता महिलांच्या(WIPL) आयपीएलची देखील मागणी जोर धरीत आहे. न्यूझीलंड संघातील काही महिला खेळाडूंनी याबाबत लवकरच महिला आयपीएल स्पर्धा सुरू होतील अशी आशा आपल्याला असल्याचे म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने अद्याप यासंदर्भात अजूनही आपली भूमिका जाहीर केली नसली तरी भारताने महिलांसाठी यापूर्वी 2018,2019,2020 मध्ये महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.न्यूझीलंड महिला क्रिकेटर यासाठी खूप उत्सुक आहेत.याबाबत बोलतांना कर्णधार सोफि डिव्हाईनने क्रिकेटमध्ये खूप सुधारणा होत आहेत, आस्ट्रेलिया मध्ये खेळल्या गेलेल्या WBBL स्पर्धा अतिशय यशस्वी झाल्याने महिला आयपीएल देखील यशस्वी होतील.

आयपीएल

new google

भारतीय खेळाडूंचा सहभाग अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आवश्यक असल्याचे सोफि ने सांगितले. मला खात्री आहे महिलांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी याचा लाभ होईल, असेही सोफीने याबद्दल मत व्यक्त करतांना सांगितले.सोफीचे समर्थन करतांना आणखी एक महिला खेळाडू सुजी बेट्स ने सांगितले की, फ्रांचायजी क्रिकेटने महिलांच्या खेळात बदल घडवून आणलेत.

आस्ट्रेलियातील WBBL आणि इंग्लंड मधील the hundred स्पर्धाच्या यशानंतर आता भारतात मोठे पाऊल उचलले जाऊ शकते असे ही खेळाडू म्हणाली. याशिवाय अमेलिया केर या तरुण क्रिकेटर ने देखील सोफि व सुजीच्या मतांशी सहमती दर्शवून महिला आयपीएल बाबत मोठे पाऊल उचलले जावे असे सांगितले. उल्लेखनीय म्हणजे बिग बॅश लीग आणि दि हँडरेड स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटरची कामगिरी दमदार राहिली.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

सचिन तेंडुलकरला वडापावसोबत हे पाकिस्तानी खाद्यपदार्थ खायला आवडतात…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here