आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कसोटी सामने सुरु होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूला वाटतेय भारताच्या या गोलंदाजाची भीती…


भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना 26 तारखेपासून सुरू होत असून भारतीय खेळाडू नवे कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात कसून सराव करीत आहेत.

भारताशी हा सामना खेळताना आम्हाला भारतीय आक्रमणाचा मुकाबला करणे मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिन याने दिल्याने भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढायला आपसूकच मदत झाली आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह पासून आम्हाला सावध तर रहावेच लागेल परंतू एकूणच भारतीय आक्रमणाचा सामना करणे कठिण असल्याचे वक्तव्य देऊन आफ्रिकन कर्णधाराने भीती व्यक्त केली आहे.

गोलंदाजा
भारतीय संघ हा जिंकण्याच्या उद्देशाने नेहमीप्रमाणे कसून सराव करीत असून तेथील वातावरण, हवामान, पिच ची स्थिती याचा अभ्यास व निरीक्षण करून खेळाडू सराव करीत आहेत. डिन याच्या या भीतीदायक वक्तव्याने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त होत आहे.असे असले तरी कर्णधाराने हार मानलेली नाही.भरता विरुद्धच्या रणानीतीवर आम्ही काम करीत आहोत असेही डिन ने सांगितले.आम्ही सावधान राहू, खेळ सुरू होण्यापूर्वी हवामान स्वच्छ राहील असे आपणास वाटते.

new google

सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरीक नॉर्टजे याला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहे, त्यामुळे बॉलिंगची धुरा कासिगो रबाडा व डुआने एलिव्हर हे सांभाळणार आहेत.
विशेष म्हणजे भारताकडून हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी ही तीन कसोटी सामन्याची सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक संधी आहे.आता भारतीय खेळाडू या दक्षिण आफ्रिकन खेळाडूच्या दुबळ्या मानसिकतेचा कसा लाभ घेतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.शिवाय विराट कोहलीवर आता केवळ कसोटी सामन्याचीच जबाबदारी असल्याने तो देखील रिलॅक्स असून केवळ कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करणे त्याला सोपे जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here