आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपली लकी वस्तू समजून दक्षिण आफ्रिकेचा हा क्रिकेटपटू आपल्या क्रिकेट किटमध्ये शेण ठेवायचा…


क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळे खेळाडू अनेकदा चर्चेत राहतात. कधी त्याच्या स्फोटक खेळीसाठी तर कधी त्याच्या मोठ्या कामगिरीसाठी.पण यादरम्यान असे अनेक क्रिकेटर्स आले आहेत जे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले. अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे क्रिकेटपटूही या खेळात सामील आहेत. अनेक खेळाडू अंधश्रद्धेत इतके बुडलेले आहेत की त्यांच्याबद्दल ऐकून तुम्हालाही आच्छर्य वाटेल.

आजचा हा किस्सा देखील अश्याच एका खेळाडूबद्दल आहे. हा किस्सा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर ‘मखाया एनटिनीबद्दलचा’ आहे. जो वाचून तुम्हीही विचारात पडाल…

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मखाया एनटिनीच्या अंधश्रद्धेशी संबंधित बातम्या अनेकदा समोर येत आहेत. अशा गोष्टींवर त्यांचा गाढ विश्वास होता असे म्हणतात. त्याच्याबद्दल एक गोष्ट अशीही समोर आली होती की, तो आपल्या किट बॅगमध्ये एका पॅकेटमध्ये शेण ठेवत असे. ते पॅकेट तो नेहमी सोबत ठेवायचा कारण तो त्याला आपला लकी चार्म मानत असे.

new google

क्रिकेटपटू

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मखाया एनटिनीचे हे रहस्य त्याने  स्वतः उघड केले होते. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, त्याने आपल्या विधानात म्हटले आहे की, ‘माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्याकडे नेहमी शेणाचा एक पॅक असायचा आणि ते माझ्यासाठी लकी असायचं. मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी मी त्याला किस करायचो. ते नेहमी माझ्यासाठी उपयुक्त ठरले.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूवर आणखी एक गंभीर आरोपही करण्यात आला होता. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मखाना अँटिनीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही झाले होते. त्याने २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.

या गंभीर विषयावर न्यायालयात सुनावणीही झाली आणि त्याला शिक्षाही झाली. मात्र, शिक्षा भोगल्यानंतर त तुरुंगातून बाहेर आला. यानंतर त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आणि पुन्हा शानदार कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली.

त्याच्या या किस्स्यामुळे आजही अनेक क्रिकेट प्रेमींच्या आठवणीत तो आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here