आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारताविरुद्ध दहा विकेट घेतलेल्या भारतीय वंशाचा ‘एजाज पटेलला’ न्यूझीलंडने बांगलादेश मालिकेतून संघाबाहेर केलंय..


न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून, त्यात भारतीय वंशाचा खेळाडू एजाज पटेलचा समावेश करण्यात आलेला नाही. या संघ निवडीमुळे सर्वांनाच आच्छर्य वाटत आहे. भारताविरुद्ध एका कसोटी सामन्याच्या डावात पटेलने सर्वच्या सर्व खेळाडूंना एकट्याने बाद केले होते. त्याच्या  पुढील मालिकेतच त्याला संघातून बाहेर काढल्याने आच्छर्य व्यक्त केलं जातंय.

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतून एजाज पटेलला बाहेरचा रस्ता दाखवला गेला असला तरीही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने एका डावात 10 बळी घेत इतिहास रचला होता. हे विसरणे न्यूझीलंड संघासाठी सोपे नसेल.

एजाज पटेल

new google

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका जानेवारी 2022 मध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश केला आहे. टॉम लॅथम पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळणार आहे कारण केन विल्यमसन जखमी झाला आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंडच्या कसोटी संघात परतला आहे. संघातील सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे एजाज पटेल यांची  झालेली हकालपट्टी. पटेलच्या अनुपस्थितीत भारतीय वंशाचा रचिन रवींद्र हा सध्या संघातील एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहे.

 असा आहे जाहीर केलेला न्यूझीलंडचा संघ: टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, नील वॅगनर.

एजाज पटेलला संघात जागा ण दिल्यामुळे क्रीडाप्रेमी न्यूझीलंड क्रिकेटच्या निवड समिती सदस्यांना ट्वीटरवर ट्रोल करत होते हे पाहून शेवटी एका सदस्याने त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय ते असं.

भारत दौऱ्यावर न्यूझीलंडसाठी एजाज पटेल यशस्वी गोलंदाज ठरला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने 17 बळी घेतले. त्याने एका डावात 10 विकेट घेत इतिहास रचला, असा पराक्रम करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला, पण असे असतानाही एजाज पटेलला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले.

एजाज पटेल संघात का स्थान मिळाले नाही  यावर स्पष्टीकरण देतांना संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, एजाज पटेलने भारतामध्ये ज्या प्रकारे चांगली कामगिरी केलीती पाहूनही त्याला संघात स्थान मिळाले नाही हे पाहून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. मात्र परिस्थितीनुसार संघ निवडण्यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. आम्हाला बांगलादेशविरुद्ध मायदेशात मालिका खेळायची आहे आणि एजाजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही. मायदेशात मालिका जिंकण्यासाठीच्या दृष्टीने हा संघ निवडण्यात आला आहे. त्यामुळेच पटेल संघात जागा बनवू शकला नाही.

एकंदरीत एजाजच्या संघात न निवडल्या जाण्याने न्यूझीलंडच्या लोकांपेक्षा  त्याच्या भारतीय चाहत्यांना दुखः वाटतय..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here