आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या स्टार भारतीय खेळाडूंची मुले लवकरच भारतीय संघात खेळतांना दिसू शकतात..


सध्या टीम इंडियाने क्रिकेट विश्वात ते स्थान मिळवले आहे  जे कोणत्याही देशासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय खेळाडूंनी अनेक दशकांपासून क्रिकेट विश्वात चमकदार कामगिरी केली आहे. भारताला असे अनेक आश्वासक खेळाडू मिळाले आहेत, ज्यांनी विक्रमांच्या बाबतीत असे प्रभुत्व मिळवले आहे, जे कोणत्याही परदेशी खेळाडूला मोडणे कठीण आहे. यातील काही खेळाडू असे असले तरी ज्यांनी क्रिकेट जगताला अलविदा केले असले तरी त्यांची मुले पदार्पणासाठी सज्ज आहेत.

आजच्या या लेखात आपण अश्याच तीन दिग्गज खेळाडूंच्या मुलांबद्दल बोलणार आहोत जे लवकरच भारतीय संघाच्या जर्सीत खेळतांना दिसू  शकतात.

सचिन तेंडुलकर: भारतीय संघ आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने आपल्या कारनाम्यांनी जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीमध्ये प्रथम नाव येते ते म्हणजे भारताचा माजी खेळाडू सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ज्याची गोलंदाजी अप्रतिम आहे. सचिनने क्रिकेट जगतात जे पराक्रम गाजवले ते देशालाच नाही तर संपूर्ण जगाला माहीत आहे. त्याने असे विक्रम केले आहेत जे मोडणे अशक्य वाटते. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये नशीब आजमावण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे.

new google

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गेल्या काही वर्षांपासून मुंबई क्रिकेट तसेच भारतीय अंडर-19 क्रिकेट संघात आपली ताकद दाखवली आहे. क्रिकेटच्या देशांतर्गत फॉरमॅटमध्ये तो ज्या प्रकारे स्वत:ला सातत्याने सादर करत आहे, त्यावरून तो आगामी काळात टीम इंडियाकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट होतय. मेहनत आणि कामगिरीत सातत्य राखत अर्जुन तेंडूलकर लवकरच भारतीय संघाच्या जर्शीत खेळतांना दिसू शकतो..

खेळाडूं

राहुल द्रविड: भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.जेव्हा द्रविड मैदानावर खेळायचा तेव्ह  प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याची वेगळी अशी एक ओळख होती. खास करून कसोटी मालिकेत द्रविड सर्वांत वरचड होता. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याने त्याच्या काळात खूप मेहनत घेतली आहे. कसोटी फॉरमॅटसाठी तो चांगला खेळाडू मानला जात आहे.

जेव्हा जेव्हा मोठ्या आणि प्रसिद्ध भारतीय फलंदाजांची चर्चा होते तेव्हा त्यात राहुल द्रविडचे नाव नक्कीच घेतले जाते.  त्यातच आता राहुल द्रविडचा मुलगाही क्रिकेटमध्ये आपल करिअर घडवण्यास उत्सुक झालाय. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड आपल्या खेळाने चाहत्यांना आणि दिग्गजांना सतत आकर्षित करत आहे. समिती क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे, ते पाहता आगामी काळात तो भारताकडून खेळू शकतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संजय बांगर: भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग असलेले संजय बांगर खेळाडू म्हणून जास्त काळ खेळू शकले नाहीत. पण माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगरला क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून चांगला अनुभव आहे. खरे तर संजय बांगरबद्दल बोलायचे झाले तर ते टीम इंडियासाठी फक्त काही कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर हा सुद्धा सातत्याने क्रिकेटमध्ये कामगिरी करतोय.त्याने काही काळापूर्वी कूचबिहार ट्रॉफीसाठी चमकदार कामगिरी केली होती. याशिवा अष्टपैलू खेळाडू आर्यन बांगरला लेस्टरशायरने कौंटी क्रिकेटच्या ज्युनियर संघात करारबद्ध केले आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात तो टीम इंडियाकडूनही खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

वडिलांनी दिलेलं प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या जीवावर वरील तिन्ही खेळाडू भारतीय संघात खेळतांना दिसल्यास नवल वाटण्यासारख काय नसेल. पण त्यासाठी त्यांना स्वतःला सिध्दही करून दाखवाव लागलं..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here