आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये हे 4 संघ कृणाल पांड्यावर मोठी बोली लावू शकतात..


जसजसं आयपीएल २०२२ चं ऑक्शनजवळ येत आहे. तसंतस  सर्वच संघ आपापल नियोजन लावण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक खेळाडूवर बारीक नजर ठेवून ते त्यांच्यावर बोली लावणार आहेत. अश्यातच आता मुंबईचा कृणाल पांड्या याच्याबद्दल काही बातम्या प्रसिद्ध होताहेत. पांड्यावर म्हणे अनेक संघ तगडी बोली लावू शकतात. पाहूया नक्की कोणते आहेत ते संघ आणि असा अंदाज का लावल्या जातोय की पांड्यावर ते संघ बोली लावण्यास उत्सुक आहे.

आयपीएल 2021पर्यंत कृणाल मुंबईचा भाग होता. पण यावर्षी संघाने त्याला रिटेन केलं नाही.  खेळाच्या तिन्ही विभागात योगदान देण्याची क्षमता त्याच्यात आहे. कृणालने गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या तीन विजेतेपदांच्या मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आयपीएल 2016 च्या लिलावात बडोद्याच्या अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्या हंगामात 12 सामने खेळून क्रुणालने 191.12 च्या सरासरीने 237 धावा केल्या. यादरम्यान त्याने शतकही झळकावले. गोलंदाजी करताना कृणालने आपल्या फिरकीच्या जोरावर 6 फलंदाज बाद केले. तो लवकरच रोहित शर्मासाठी महत्त्वाचा खेळाडू बनला.

तो त्याच्या चार षटकांमध्ये अतिशय किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि खालच्या मधल्या फळीत फलंदाजीत पारंगत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याच्या कामगिरीत घसरण होत आहे. 2021 च्या आयपीएलमध्ये त्याला 13 सामन्यात फक्त 5 विकेट घेता आल्या होत्या आणि फलंदाजी करताना तो 116.26 च्या स्ट्राईक रेटच्या मदतीने केवळ 143 धावा करू शकला होता.

तर कृणाल पांड्याबद्दल आज आम्ही तुम्हाला अशा 4 फ्रँचायझींबद्दल सांगत आहोत ज्या त्याला मेगा ऑक्शनमध्ये टार्गेट करू शकतात.

 अहमदाबाद: CVC कॅपिटलच्या मालकीची अहमदाबाद फ्रँचायझी या आयपीएल2022 आवृत्तीमध्ये प्रथमच खेळणार आहे. अशा परिस्थितीत या फ्रँचायझींना त्यांच्या संघात अनुभवी आणि सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करायला आवडेल. त्यांना संघ मजबूत करू शकतील अशा खेळाडूंची गरज असेल आणि कृणाल पांड्या या प्रकरणात पूर्णपणे फिट आहे.

एक अनुभवी खेळाडू असल्यानेअहमदाबाद फ्रँचायझी कृणालला त्यांच्या संघात सामील करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकते. त्यांना अहमदाबादचे मैदान आणि विकेट इतर कोणाहीपेक्षा चांगले माहित आहे जे नवीन संघासाठी एक प्लस पॉइंट असेल. याशिवाय अहमदाबादहून येणाऱ्या प्रेक्षकांची नाडी क्रुणालला माहीत आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यापासून चाहत्यांशी नाते निर्माण करण्यास फ्रँचायझीला मदत होईल.

कृणाल पांड्या

पंजाब किंग्ज: पंजाबने फक्त मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंगला कायम ठेवले आहे. त्यांना पूर्णपणे नवीन संघ तयार करायचा आहे. खालच्या-मध्यम क्रमवारीत खोली नसल्यामुळे, फ्रँचायझी गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करू शकलेली नाही. अशा परिस्थितीत पंजाबला कोणत्याही परिस्थितीत कृणाल पांड्याला त्यांच्या संघात सामील करून घ्यायचे आहे. ३० वर्षीय क्रुणाल परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकतो आणि गोलंदाजीच्या मदतीने संघाला ताकदही देऊ शकतो.

त्यामुळे अशा स्थितीत पंजाब किंग्स त्याला आपल्या कॅम्पमध्ये सामावून घेण्याचे निश्चितपणे लक्ष्य करेल. याशिवाय तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. पंजाबला भारतीय क्रिकेटपटूंचा भक्कम आधार तयार करायचा आहे आणि कृणाल पांड्या त्यांच्या संघासाठी उत्कृष्ट खेळाडू ठरू शकतो.

सनरायझर्स हैदराबाद: स्पर्धेतील सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक असलेल्या हैदराबादने गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी केलेली नाही ज्यासाठी ते ओळखले जातात. 2021 च्या आयपीएलमध्ये त्याच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता स्पष्टपणे दिसून आली.

विजय शंकर आणि मनीष पांडे पूर्णपणे फ्लॉप ठरले. अब्दुल समद, प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मासारखे युवा आणि प्रतिभावान खेळाडूही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे आयपीएल २०२२ च्या लिलावापूर्वी संघाने फक्त अब्दुल समद, उमरान मलिक आणि कर्णधार केन विल्यमसन यांनाच कायम ठेवले आहे. अशा स्थितीत हैदराबादच्या समस्येवर योग्य उपाय असू शकतो तो म्हणजे ‘क्रुणाल पांड्या’. क्रुणाल मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो आणि चार षटकांच्या कोट्यात कमी धावा खर्च करत किफायतशीर गोलंदाजीही करू शकतो..

 मुंबई इंडियन्स: क्रुणाल पांड्याने 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून तो आतापर्यंत मुंबईकडून खेळत होता. त्याने मुंबईसाठी चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. कृणाल पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 84 सामने खेळले असून 138.54 च्या स्ट्राइक रेटने 1143 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे, जे त्याने त्याच्या आयपीएल पदार्पणाच्या मोसमात केले होते.

गोलंदाजी करताना त्याने 7.36 च्या इकॉनॉमीने 51 विकेट्स घेतल्या आहेत. या उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा कोणत्याही परिस्थितीत आपल्या संघात समावेश करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. जास्त खेळाडू रिटेन करता न आल्यामुळे मुंबईला अनेक स्टार खेळाडूंना सोडावं लागलं होत. कृणाल त्यापैकीच एक आहे.

आता ऑक्शननंतर कृणाल नक्की कोणत्या संघाच्या जर्शीत खेळतांना दिसेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here