आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयपीएल 2022साठी या चार खेळाडूंना संघात सामील करण्यासाठी आरसीबी सर्वोतोपरी प्रयत्न करेल…


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी करत आहे तरीही आतापर्यंत जेतेपद जिंकण्यात अपयशी ठरले असले तरीही आयपीएलच्च्याया मागच्या दोन हंगामात ते विराट कोहलीच्या नेतृत्वात प्लेऑफमध्ये पोहचले होते. आता कर्णधार विराट कोहली असणार नाही त्यामुळे साहजिकच बंगलोर संघाला कर्णधार आणि काही सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू आपल्या संघासोबत जोडण्याची नितांत आवश्यकता भासणार आहे.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्यांच्या संघात समाविष्ट करू शकते.

 टी नटराजन: भारताकडे सर्वोत्तम डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांची कमतरता असल्याने, टी नटराजन हा देशांतर्गत वेगवान गोलंदाज म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2021 मधील त्यांचा सर्वोत्तम गोलंदाज आणि पर्पल कॅप विजेता हर्षल पटेलला कायम ठेवलेले नाही. त्यामुळे आता फ्रँचायझीला चांगल्या डेथ-बॉलरची गरज भासणार आहे.

नटराजन पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्स दोन्हीमध्ये गोलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीत मेगा लिलावात त्याला लक्ष्य करण्याचा आरसीबी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

 डेव्हिड मिलर: आयपीएल 2013 ते 2015 या काळात डेव्हिड मिलरची लीगमधील अव्वल खेळाडूंमध्ये गणना होते. मात्र, आयपीएल २०२१ मध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, आयसीसी टी-२० विश्वचषकात त्याची कामगिरी चांगली होती. जे पाहून असे म्हणता येईल की दक्षिण आफ्रिकेचा स्टार किलर मिलरने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

आयपीएल 2022 मध्ये या लीगमध्ये दोन नवीन फ्रँचायझी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतर मेगा लिलावात सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंना साईन करण्यासाठी मोठी बोली लावली जाणार आहे. त्यामुळे डेव्हिड मिलर हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी उत्कृष्ट खेळाडू ठरू शकतो.

आरसीबी

 मिचेल स्टार्क: आयपीएलच्या शेवटच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात चांगल्या विदेशी वेगवान गोलंदाजाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. मात्र, हर्षल पटेलच्या प्रतिमेसमोर सर्व काही दडले होते. पण, तरीही जर मिचेल स्टार्कने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात स्वतःला उपलब्ध करून दिले, तर आरसीबी त्याला निश्चितपणे लक्ष्य करू शकते.
आयपीएल 2021 दरम्यान स्टार्कने सांगितल्याप्रमाणे, पुढच्या वर्षी आयपीएल होईल आणि जर मला खेळण्याची इच्छा असेल किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांची इच्छा असेल, तर मला नक्कीच त्याचा विचार करायला आवडेल.

त्याचे हे वक्तव्य पाहता तो या हंगामात मेगा लिलावासाठी उपलब्ध होणार असल्याचे दिसते. मिचेल स्टार्क सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने त्याला निःसंशयपणे मागणी आहे. त्यामुळे आरसीबी त्याला लक्ष्य करू शकते.

 ईशान किशन:आयपीएल 2021 मध्ये इशान किशनचा फॉर्म खराब होता. मात्र, असे असूनही त्याला मुंबई इंडियन्सकडून कायम ठेवले जाईल, असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. इशान किशन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज आहे जो संघात सलामीवीराची भूमिका बजावण्याव्यतिरिक्त मधल्या फळीत वेगवान धावा देखील करू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचा त्यांच्या कायम ठेवण्याच्या यादीत समावेश केला आहे. ज्याचा सरळ अर्थ असा की त्यांना यष्टिरक्षकाची गरज भासेल. तसेच, टॉप ऑर्डर मजबूत करण्यावर किंवा कोहलीसह डावाची सुरुवात करताना डाव्या-उजव्या संयोजनावर लक्ष केंद्रित करताना,आरसीबी इशान किशनला लक्ष्य करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल.

डेव्हिड वॉर्नर: आधीच अपेक्षेप्रमाणे सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नरला सोडून केन विल्यमसनला कायम ठेवेल आणि तसंच झालं. त्यामुळे वॉर्नरला आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याची सुटका होणार होती. मात्र, आता वॉर्नर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने T20 विश्वचषकात ज्या प्रकारे चांगली कामगिरी केली होती आणि आता ऍशेसमध्येही चांगली कामगिरी करत आहे.

त्याच्याकडे पाहताआयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी वॉर्नरची मागणी खूप वाढणार आहे, असे म्हणणे योग्य ठरेल. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला कर्णधाराची गरज आहे. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या वॉर्नरशिवाय बंगळुरूसाठी दुसरा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here