आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

‘ऑटो शंकर’ तो सिरीयल किलर ज्याने आपल्या टोळीच्या साथीने चेन्नईच्या रस्त्यांवर मुलींचे बाहेर पडणे अवघड करून ठेवलं होत.


सिरीयल किलर म्हटलं की सर्वाना आठवतो तो क्रूर माणूस जो विनाकारण लोकांना एका पाठोपाठ मारत असतो. बहुतांश सिरीयल किलरची ओळख ही आपल्याला चित्रपटांतून किंवा कथा वाचनातूनच झालेली असावी. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अश्या सिरीयल किलरविषयी सांगणार आहोत ,ज्याने अनेक मुलींना आपल्या वासनेचाशिकार बनवलं आणि नंतर त्यांना मारून टाकले. तो सिरीयल किलर म्हणजेच ऑटो चालवणारा ‘ऑटो’ शंकर! त्याकाळी चेन्नईमध्ये याची एवढी दहशद निर्माण झाली होती की, लोक आपल्या मुलींना बाहेर सुद्धा पडू देत नव्हते.

त्याचे खरे नाव गौरी शंकर पण लोक त्याला ऑटो शंकर नावानेच हाक मारायचे कारण तो ऑटो चालवत असे.  त्याच्यावर 9 हून अधिक खूनांचा आरोप होता. आधी तो मुलींचे अपहरण करायचा नंतर बळजबरीने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि नंतर त्याच्या साथीदारांना विकायचा.

Serial Killer Auto Shankar was Another Name of Terror dgtl - Anandabazar

1955 मध्ये वेल्लोरच्या कंगयानाल्लूर गावात जन्मलेल्या गौरी शंकर पैसे कमवण्याच्या उद्देशाने चेन्नईच्या पेरियार नगरमध्ये स्थायिक झाला. त्याने आधी पेंटर म्हणून काम करायला सुरुवात केली नंतर ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. तो तिरुवनमीयुर आणि ममल्लापुरममध्ये अवैध धंदे करत असे.

हत्येची मालिका कशी सुरू झाली आणि त्याची फाशी कशी झाली ते थरकाप आणनारे आहे.

अचानक झालेल्या एवढ्या हत्यांमुळे चेन्नई पोलिसांसमोर मोठ आव्हान उभ राहिलं होत. याच्याच छडा लावण्यासाठी चौकशी केली असता पोलिसांसमोर एक नाव समोर ते म्हणजे ऑटो शंकर.

चेन्नईच्या इतिहासात असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. 1987 ते 1988 या काळात ऑटो शंकर आणि त्याच्या टोळीने भयानक खून, बलात्कार आणि धोकादायक कट रचले होते. त्याची वासना पूरी होईपर्यंत किंवा मुलीचा मृत्यू होईपर्यंत त्याचे हे दुष्कर्म सुरू राहते. यानंतर मुलीला ठार मारून जाळण्यात येत असे नाहीत मग नदीत फेकून देत किंवा घरात पुरले जात. या हत्यांमुळे तो 1980 च्या सुमारास चेन्नईचा कुप्रसिद्ध सिरीयल किलर बनला. यामुळे संपूर्ण चेन्नई हादरली होती.

त्याचा धाकटा भाऊ मोहन आणि त्याचा मेहुणा एल्डिन आणि शिवाजी, जयवेलू, राजारामन, रवी, पलानी आणि परमाशिवम यांच्या मदतीने शंकर लवकरच तिरुवनमियुरचा सर्वात जघन्य गुन्हेगार बनला होता. काही दिवसानंतर डिसेंबर 1988 मध्ये रस्त्यावरून जात असलेल्या सुबालक्ष्मी नावाच्या विद्यार्थिनीचे दारूच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले होते. मात्र ती कशीतरी पळाली आणि गेल्यानंतर तिने त्याबद्दल पोलिसात तक्रार केली.

तपासचक्रे गतिमान करत शंकरला पकडण्यात पोलिसांना यश आले आणि शंकरला अटक करण्यात आली. शंकरला नंतर चेन्नई सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले,तेथून तो ऑगस्ट 1990 मध्ये पळून गेला. त्यानंतर त्याला ओडिशातील राउरकेला येथून परत अटक करण्यात आली.

ऑटो शंकर

पोलिसांनी तपास केल्यानंतर ऑटो शंकरवर ललिता, सुदलाई, संपत, गोविंदराज आणि रवी यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. या लोकांना ठार मारल्यानंतर एकतर जाळण्यात आले किंवा घरातच पुरले गेले होते. कोर्टात हे प्रकरण समोर आल्यानंतर ऑटो शंकर आणि त्याच्या खतरनाक टोळीला 1988 ते 1989 या दोन वर्षात झालेल्या 6 खूनांसाठी दोषी ठरवण्यात आले. या गुन्हेगारांमध्ये त्याचा लहान भाऊ ऑटो मोहनचाही समावेश होता. ज्याला प्रत्येक हत्येसाठी 3 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

त्यानंतर ऑटो शंकरला 27 एप्रिल 1995 रोजी सेलम सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. आणि यासोबतच चेन्नईतील या सीरियल किलरची दहशत संपली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here