आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

ऑस्ट्रेलियाने अॅशेस राखली, मालिकेत इंग्लंडचा मानहानीकारक पराभव!


अॅशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला दुसऱ्या डावात ६८ धावांमध्ये बाद करत ऑस्ट्रेलियाने ३-० असा मालिका विजय साकारला. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडने चार षटकात सात धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याच्या प्रभावी गोलंदाजी समोर अक्षरशः इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि इंग्लंडचा डाव अवघ्या ६८ धावांमध्ये आटोपला. अडीच दिवसात सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बोलंड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडला फक्त ६० षटके खेळता आली आणि त्यात त्यांनी केवळ १८५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान संघ ऑस्ट्रेलियाने २६७ धावा करत ८२ धावांची आघाडी मिळवली. मात्र तिसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या तब्बल ८ फलंदाजांना दुहेरी धावांचा आकडा देखील गाठता आला नाही. कर्णधार जो रूट ने सर्वाधिक २८ धावा केल्या तर त्या खालोखाल बेन स्टोक्स ने ११ धावा करत संघ सावरण्याचा अपुरा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना ४ गाडी बाद ३१ धावा अशी इंग्लंडची अवस्था होती. त्यामुळे तिसऱ्या दिवशी पराभव वाचवण्याची जबाबदारी असणाऱ्या बेन स्टोक्सला खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे गरजेचे होते पण त्याला स्टार्कने त्रिफळाचीत केले. त्यानंतर बोलंडने धमाकेदार कामगिरी करत अवघ्या ११ चेंडूत ३ फलंद्जना माघारी धाडले आणि कॅमरन ग्रीन ने शेवटची विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


====

new google

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here