आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

BCCI अध्यक्ष यांना करोनाची लागण; प्रकृती स्थिर


इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुली यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हाती येत आहे. करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला करोना संसर्ग झाला आहे. तो सध्या कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात उपचार घेत आहे.

सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. काल रात्री उशिरा गांगुलीची करोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून लक्षणे सौम्य आहेत.

new google

गेल्या वर्षी सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्याला वुडलँड्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यावेळी महिन्याभरात दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या होत्या.सोमवारी रात्री उशिरा गांगुली यांचा करोनाचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आलं आहे. ओमिक्रॅानच्या(omicron) वाढत्या संकटात आता सौरव गांगुलीला करोनाची लागण झाल्याची बातमी ही चाहत्यांसाठी चिंतेची बाब आहे.

गांगुलीला कोलकात्यातील घरात व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर त्यावेळी अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. पण परत मात्र त्याला २० दिवसांनी त्याला पुन्हा छातीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्याबर २८ जानेवारीला दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी झाली होती. त्यावेळी दोन धमन्यांमध्ये दोन स्टेंट बसवण्यात आले.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here