आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

रहाणेनंतर या खेळाडूने कोरले मुलाघ मेडलवर नाव


 

अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी नावाने ओळखली जाणारी तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव करत मालिका खिशात टाकली आणि अॅशेस पुन्हा राखली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करत असलेल्या स्कॅाट बोलँडने (Scott Boland) खेळाडूने मुलाघ मेडलवर नाव कोरत कमालच केली.

new google

पहिल्या डावात फक्त एक गडी बाद करण्यात त्याला यश आले होते. पण मात्र दुसऱ्या डावात फक्त चार षटके टाकत सात धावत सहा फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे इंग्लडला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्याचा मानकरी म्हणून स्कॅाट बोलँडला नावाजण्यात आले. पण, त्याचबरोबर त्याला प्रतिष्ठेचा मुलाघ मेडलनेही (The Mullagh Medal) सन्मानित करण्यात आले.

विशेष म्हणजे भारताच्या अजिंक्य रहाणेला सर्वात प्रथम मुलाघ मेडलने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मुलाघ मेडलवर नाव कोरणारा स्कॅाट बोलँड हा दुसरा खेळाडू ठरला. मुलाघ मेडलची सुरुवात ही २०२० मध्ये करण्यात आली होती.

खरं तर मुलाघ मेडलचा इतिहास हा १५२ वर्षापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला कर्णधार आहे, म्हणूनचं त्याच्या नावाने हा पुरस्कार सुरु करण्यात आला. जॉनी मुलाघ यांनी १८६८ साली पहिल्यांदा विदेशी दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले होते. ऑस्ट्रेलियाने त्यावेळी इंग्लंडचा दौरा केला होता. मुलाघ त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४५ कसोटी सामने खेळले होते. त्यातील ७१ डावात त्यांनी १हजार६९८ धावा केल्या होत्या. गोल्न्दाजीतही उत्कृष्ट अशी कामगिरी करत २५७ विकेट्स घेतल्या होत्या. १८६६मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानवर एक बॉक्सिंग डे कसोटी देखील खेळला होता.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here