आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघासाठी विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी करणाऱ्या या स्पर्धकांची होऊ शकते निवड!


दक्षिण आफ्रिकेच्या पुढील ३ सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी होणारी निवड ही रोहित शर्माच्या दुखापतीमुळे ३-४ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवड साधारण ३१ डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे. समितीची बैठक होण्याआधी विजय हजारे करंडक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांची निवड होण्याची बातमी पुढे आली आहे.

new google

विजय हजारे करंडक २०२१ स्पर्धा ही मुख्य तीन फलंदाजामुळे चांगलीच चर्चेत आली. शाहरुख खान हा मध्यम क्रमांकाचा फलंदाज असून त्याने ७ डावात २० षटकार लगावत १८६ पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखला आणि ४२ सरासरीने १५३ धावा केल्या. मुख्यत: ६ व्या आणि ७ व्या क्रमांकावर येऊन मिळवलेले हे यश खरच कौतुकास्पद म्हटले पाहिजे.

अष्टपैलू समजल्या जाणाऱ्या व्यंकटेश अय्यर ला देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याने ६३.६१ च्या सरासरीने २१ षटकार ठोकत ३८६ धावांचा रतीब घातला तर उत्कृष्ट गोलंदाजी करत ९ विकेट्स घेत आपली योग्यता सिद्ध केली आहे. ऋतुराज गायकवाडने विजय हजारे चषकात सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. १५०.७५ च्या सरासरीने ६०३ धावा फटकावल्या. यामध्ये पाच डावात ४ शतक झळकावत सर्वोत्कृष्ट फलंदाज होण्याचा बहुमान त्याने मिळवला.

आता खरच नवीन प्रतिभावान खेळाडूना संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here