आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

दक्षिण आफ्रीका विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ ढेपाळला!


दक्षिण आफ्रीका विरुद्ध भारत यांच्यात रविवारपासून सेन्चूरियन येथील ‘सुपरस्पोर्ट पार्क’ मैदानावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. बॉक्सिंग डे कसोटी असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी खेळाच्या पहिल्या सत्रातच भारतीय संघ ३२७ धावत बाद झाला. या सामन्यातील दुसऱ्या दिवस पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता रद्द करण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवसअखेर जिथे खेळ थांबला तिथूनच भारताच्या पुढील डावाला सुरुवात झाली.

त्यामुळे पहिल्या दिवसअखेर भारताची नाबाद असलेली फलंदाजांची जोडी अजिंक्य रहाणे आणि के. एल. राहुल मैदानात उतरले. रहाणेने ४० धावांपासून आणि राहुलने १२२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यांनी ९१ षटकांपासून आणि 3 बाद २७२ धावांपासून भारताचा पहिला डाव पुढे नेण्यास तिसऱ्या दिवशी सुरुवात केली. मात्र भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.

new google

शतकवीर के. एल. राहुल दिवसाच्या चोथ्या आणि डावातील ९४ व्या षटकात बाद झाला. त्याने २६० चेंडूत १२३ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि एक षटकार मारला. त्या पाठोपाठ कागीसो रबाडाने ४८ धावांवर अजिंक्य रहाणेला उसळत्या चेंडूवर डिकॅाकच्या हातात झेलबाद होत माघारी धाडले. पंत आणि रहाणेची जोडी फार काळ टिकू शकली नाही. लुंगी एन्गिडी याने भारताविरुद्ध दुसऱ्यांदा ५ विकेट घेत विक्रम केला. त्याने एकूण ६ गडी बाद केले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे भारतीय संघ ३२७ धावांत आटोपला.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here