आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघातील निवड झालेल्या किराणा दुकानदाराच्या मुलाची कहाणी


२०२२ मध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने ‘यश धुलच्या’ नेतृत्वाखाली १७ सदस्यांचा संघ जाहीर झाला आहे. एस के रशीद संघाचा उपकर्णधार असेल. मात्र, क्रिकेट जगतात विशेष चर्चा सुरु आहे ती म्हणजे, गाजियाबादचा ‘सिद्धार्थ यादवची’! त्याने मोठी संघर्ष करून आपले स्थान संघात पक्के केले आहे.

गाजियाबादच्या कोटगावमध्ये सिद्धार्थचे वडील एक किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांची देखील क्रिकेटर बनण्याची मनापासून इच्छा होती परंतु ते नेट बॉलरच्या पुढे जाऊ शकले नाहीत. आत्ता त्यांचा मुलगा सिद्धार्थ वडिलांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी युएईमध्ये सुरु असणाऱ्या आशिया कप आणि वेस्ट- इंडीजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळणार आहे.

new google

वडील श्रवण म्हणाले की जेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थने बॅट हातात घेतली होती तेव्हाच मला वाटले होते की, तो एक चांगला डावखुरा हाताचा फलंदाज बनणार आहे. आज तिच भविष्यवाणी सिद्धार्थने खरी करून दाखवली. त्याने खूप मेहनत केली आणि आज तो भारताच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा भाग आहे. आठव्या वर्षापासून सिद्धार्थने आपली मेहनत डबल केली, आणि याच मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. सिद्धार्थचे वडील श्रवण म्हणले की, सुरुवातीला मी रोज ३ तास दुकान बंद करून त्याचा सराव घेत असे.

ते म्हणाले, मी माझे दुकान दुपारी २ वाजता बंद करायचो आणि मग आम्ही संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मैदानात सराव करत. त्यानंतर पुन्हा दुकान सुरु करत होतो. तसेच ते पुढे म्हणाले, तो इतका थकायचा की त्याला भान राहत नव्हते. सिद्धार्थच्या कुटुंबातील सर्वाना त्याला साथ दिली नाही. त्याने अभ्यासात लक्ष घालावे अशी त्याची आजीची इच्छा होती. श्रावणने सांगितले की, त्याला हे जुगार खेळण्यासारखे वाटले. आयुष्य उद्धवस्त होईल. एक भटकंती असेल. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांचे एक स्वप्न होते, जे त्याला पूर्ण करायचे होते.

संघ- यश धुल(कर्णधार), एस के रशीद(उपकर्णधार), हरनुर सिंग, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना(यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर.एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here