आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

केएल राहुलने कसोटी फलंदाजी करत फलंदाजीतील तंत्र बदलले त्याचेच हे यश


केएल राहुलचे प्रशिक्षक सॅम्युअल जयराज यांनी 29 वर्षीय राहुल बद्दल बोलताना फलंदाजीतील तंत्र बदलत इंग्लंडमधील कसोटीत चमक दाखविण्यास सुरुवात केली. तांत्रिक बदलांमुळे मानसिक परिवर्तन आणि तासंतास नेटमध्ये घाम गाळल्याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत.

२०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची पुढील वर्षी लवकरच घोषणा होणार आहे. संघाकडून सलामीला कोण खेळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मयांक अग्रवाल, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावे आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण आफ्रिका बरोबरच्या मालिकेत उपकर्णधार झाल्यापासून ते कालपर्यंतच्या कसोटी मालिकांमध्ये खेळताना राहुलनं शतकी खेळी करून बीसीसीआयच्या निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.

new google

आगामी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या निवड समितीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी कोहली आणि द्रविड व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेउपस्थित राहणार आहे. त्यानंतर संघाच्या माहितीबाबत आढावा घेतला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप स्पर्धेसाठी संघात कुणाला स्थान मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या संघात स्थान मिळवण्याचं दडपण अनेक खेळाडूंवर आहे. के. एल. राहुलही जोरदार प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दौरा राहुलने गाजवला होता. त्या स्पर्धेच्या कामगिरीवर संघ निवडला जाणार आहे की नाही हे लवकरच स्पष्ट होईल, असं कर्णधार विराट कोहलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कुणाला संधी द्यावी, असा निवड समितीसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दौरा आणि आगामी मालिकांमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचं लक्ष राहणार आहे, असं मानलं जातं.

श्रेयश अय्यर किंवा अजिंक्य रहाणेला संधी मिळावी, असं अनेक माजी खेळाडूंना वाटतं. पण आतापर्यंतच्या प्रवासात खेळताना अजिंक्यने फारशी चांगली कामगिरी केली आहे असं दिसलं नाही. त्यानं एकूण २३ सामन्यांत ५१७ धावा केल्या आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया दौर्यावरील मेलबर्नमध्ये झळकावलेले शतक आहे. पण राहुलने मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी करून निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या कामगिरीच्या जोरावर राहुलला वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचे तिकीट मिळतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here