आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

प्रसिद्ध भारतीय गोलंदाजाच्या वागणुकीवर नेटीझन्स दर्शवली नाराजी


अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा एका चाहत्या सोबत छायाचित्र काढतानाचा व्हिडीओ वायरल झाला असून त्यात तो ज्या पद्धतीने वागला आहे ते पाहून नेटकरी नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. हार्दिक सोबत छायाचित्र घेताना चाहत्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता जो त्याने कडून टाकला. नेटकऱ्याच्या मते हे एक उद्धट प्रकारचे वागणे असून ते टाळता आले असते. तर काहींच्या मते चाहत्यांना सुद्धा आपण कसे वागावे याची मर्यादा आपल्याला ठाऊक असली पाहिजे असे वाटते.

२८ वर्षीय हार्दिक पांड्या हा सध्या भारतीय संघाच्या कोणत्याही दौऱ्यात सहभागी नसून तो सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत देखील अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावत नाही आहे.

new google

एका प्रसिध्द संकेत स्थळाने दिलेल्या माहिती नुसार, हार्दिक पांड्या ने स्वत: आपण पुढच्या काही मालिकासाठी उपलब्ध नसणार आहे असे निवड समितीला कळवले आहे. तर येत्या काळात स्वतःच्या फिटनेस कडे पुरेपूर लक्ष देत पूर्णवेळ गोलंदाज म्हणून संघात परतण्याचे संकेत दिले आहेत.

सध्या हार्दिक पांड्या हा त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत असून त्याचा मुलगा अगस्त्य, पत्नी आणि भाऊ कृणाल पांड्या आणि त्याच्या पत्नी बरोबरचे ख्रिसमस साजरा करतानाचे काही छायाचित्र त्याने सोशल मिडिया वर शेअर केले आहेत.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here