आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

भारतीय संघाला पाकिस्तान संघावर पराजयाचा वचपा काढण्याची संधी मिळणार का?


सध्या युएई मध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ आशिया कपमध्ये उद्या उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. पहिला उपांत्य सामना हा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुबई येथे तर दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश हा शारजाह येथे खेळवला जाणार आहे. जर या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान विजयी ठरल्यास त्यांच्यातला थरार दुबई येथे अंतिम सामन्यात पाहायला मिळेल.

अंडर-१९ आशिया कप मध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. पाकिस्तानने ३ सामन्यात विजय मिळवला तर श्रीलंका, बांगलादेश आणि भारताने प्रत्येकी २ विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. श्रीलंकेने आणि बांगलादेशने साखळी सामन्यात अनुक्रमे कुवेत आणि नेपाल यांचा पराभव केला तर कोविड -१९ च्या प्रभावामुळे त्यांच्यातील सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

new google

भारताने आणि पाकिस्तानने देखील युएई आणि अफगानिस्तान या प्रतिस्पर्ध्यांना मत दिली तर एकमेकांविरोधात लढताना अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने २ गडी राखत भारतावर विजय मिळवला. याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला मिळण्याची शक्यता अंतिम सामन्यात मिळू शकते.

उद्या सकाळी 11 वाजता दोन्ही उपांत्य सामने सुरु होणार आहेत. उपांत्य सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ:

हरनूर सिंग, अंगक्रीश रघुवंशी, शेख रशीद, यश धूल (कर्णधार), निशांत सिंधू, राज बावा, आराध्य यादव (यष्टीरक्षक), कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल आणि रवी कुमार.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here