आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

नव्वदीच्या दशकातील एक हरहुन्नरी गोलंदाज करणार नव्या इंनिंग ची सुरुवात!


दिग्गज भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग ने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या २३ वर्षाच्या कारकीर्दीत त्याने अनेक विक्रम केले. हरभजन सिंग ने वयाच्या १७ व्या वर्षी खेळण्यास सुरुवात केली होती आणि आज वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्त होत आहे.

भारताच्या जर्सीमध्ये निवृत्त होण्याची संधी न मिळाल्याची खंत देखील त्याने बोलून दाखवली होती. मात्र जे होते ते चांगल्या साठीच असे समजत त्याने आपले गुरु संत हरचरण सिंगजी, आई वडील आणि BCCI चे आभार मानले.

new google

हरभजन सिंग ने कसोटी क्रिकेटमध्ये ४१७ विकेट्स आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी-२० क्रिकेट मध्ये २५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतके हरभजनच्या नावावर आहेत. भारतासाठी कसोटीत हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय तो ठरला होता.

दरम्यान हरभजन सिंगचे नवज्योत सिंह सिद्धू या सोबतचे फोटो पाहता पुढील इंनिंग मध्ये त्याची राजकारणातील प्रवेशाची शक्यता नाकारता येत नाही. २०२२ मध्ये पंजाब येथे होऊ घातलेल्या  विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता या वक्तव्यास अनेक राजकीय अर्थ प्राप्त होतात. किंवा, तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेंटोर पदासाठी निवड होण्याची देखील शक्यता आहे. आता नेमकी पुढील वाटचाल नेमकी कशी असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here