आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

दक्षिण आफ्रिका संघ १९७ धावांत गारद ; १४६ धावांची भक्कम आघाडी


कसोटी कारकीर्दीतील २०० बळींचा टप्पा गाठणाऱ्या मोहम्मद शमीसह (५/४४) भारताच्या वेगवान चौकडीने केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व प्रस्थापित करताना तिसऱ्या दिवसअखेर एकूण १४६ धावांची भक्कम आघाडी मिळवली.
सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावात अखेरचे सात फलंदाजांना अवघ्या ५५ धावांत गमावले. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे खेळपट्टीचा नूर पालटला आणि तिसऱ्या दिवशी अठरा फलंदाज बाद झाले. दुसऱ्या डावात १बाद १६ धावा केल्या असून सलामीवीर के. एल. राहुल ५, तर ‘नाईट वॅाचमन’ म्हणून आलेला शार्दूल ठाकूर ४ धावांवर खेळत आहे. मयांक अग्रवाल ४ धावा करत स्वस्तात माघारी परतला. मात्र सामन्याचे दोन दिवस अद्याप शिल्लक असल्याने भारताला विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
तत्पूर्वी, दुपारच्या सत्रात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वैयक्तिक सहावे षटक टाकताना घोट्याची दुखापत झाली होती. त्याने मैदान सोडले होते. यानंतर अखेरच्या टप्प्यात तो गोलंदाजीला आला आणि त्याने केशव महाराजला बाद करून दक्षिण आफ्रिकेला गुंडाळले.
त्याचबरोबर यष्टीरक्षक ॠषभ पंत याने विशेष कामगिरी तर केलीच, पण त्यासोबतच त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रमही मोडीत काढला. ॠषभ पंतच्या नावे मालिका सुरु होण्यापूर्वी यष्टीरक्षक म्हणून ९७ बळी होते. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने आणखी चार झेल टिपत कसोटील आपलं बळींच शतक पूर्ण केलं. आता पंतच्या नावे यष्टीरक्षक म्हणून १०१ गडी आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामना हा पंतचा २६ वा कसोटी सामना होता. महेंद्रसिंग धोनीने ३६व्या कसोटी सामन्यात ही किमया केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद बळींचे शतक पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत पंत आणि धोनीनंतर वृद्धिमान साहा तिसरा (३७), किरण मोरे चोथे (३९), नयन मोंगिया पाचवे (४१), आणि सय्यद किरमाणी सहाव्या स्थानी (४२) आहेत.


====

new google

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here