आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

अॅशेस मालिकेतील तिसरी कसोटी जिंकत ऑस्ट्रेलिया चॅम्पियनशिप गुणतालिकेत प्रथम, तर भारताला देखील या क्रमांकावर पोहोचण्याची संधी


ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत ३ सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या विजयाच्या जोरावर विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने १०० टक्के विजयाची सरासरी गाठत प्रथम क्रमांकावर झेप गेतली आहे.

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. ज्याचा फायदा त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी झाला. तर खराब कामगिरीमुळे इंग्लंडची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. १०० टक्के विजयाची सरासरी असणारे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

new google

इंग्लंड संघ ७.१४ च्या विजयी सरासरीने सातव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाची ही आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे. या सरासरी मध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना अॅशेस मालिकेच्या उर्वरित २ कसोटी सामन्यामध्ये सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे.

भारतीय संघाकडे सर्वात जास्त गुण (४२) असून देखील विजयाची सरासरी ५८.३३ टक्के असल्याने भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान या गुणतालिकेत ७५ टक्के सरासरी गाठत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असणाऱ्या मालिकेवर भारताचे स्थान हे अवलंबून असणार आहे.

संघाची क्रमवारी हि गुणांच्या टक्केवारीवर आधारित असते. या मध्ये विजयी संघाला १२ गुण, सामना बरोबरीत सुटल्यास ६ गुण, सामना अनिर्णित राहिल्यास ४ गुण आणि पराभवासाठी कोणतेही गुण देण्यात येणार नाही. येत्या काळात गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here