आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

कुचबिहार मध्ये महाराष्ट्राचा डंका हिमाचल प्रदेशवर मात


अभिषेक पवार, सचिन धस, शर्विन किसावे, यांची अर्धशतके आणि अभिषेक निषाद, शुभम खरात, राझेक फल्ला यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने कुचबिहार करंडक क्रिकेट महाराष्ट्राचा हिमाचल प्रदेशवर २३७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला आणि बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. साखळी लढतीतमहाराष्ट्राने हिमाचलसह गोवा, तामिळनाडूआणि छत्तीसगड या संघाने हरवले, तर मध्य प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राला हार पत्करावी लागली. महाराष्ट्र संघ ‘क’ गटात २६ गुणांसह अव्वल स्थानी राहिला.

सुरतमध्ये ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने सचिन धसच्या अर्धशतकाच्या (७३) जोरावर पहिल्या डावात २२० धावा केल्या होत्या. त्यानंतर अभिषेक निषादच्या (८ बळी ) अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल संघाचा डाव १६३ धावांत आघाडी घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ४बाद २१९धावा केल्या होत्या. त्यात महाराष्ट्राने तिसऱ्या दिवशी १२१ धावांची भर घातली आणि हिमाचल प्रदेशसमोर ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले.

new google

https://www.bcci.tv/domestic/cooch-behar-trophy-2021-22/match/87

दुसऱ्या डावात महाराष्ट्राकडून अभिषेक पवारने १५४ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. तसेच , सचिन धसने १७० चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ७६ धावांची, तर शर्विन किसावेने ११० चेंडूत बारा चौकारांसह ७० धावांची खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला हिमाचल संघाची ३ बाद १८ अशी अवस्था झाली होती. मृदुल सुरोच आणि नंतर रॉबिन संदल यांनी झुंज दिली. मात्र, अखेरीस हिमाचल प्रदेशचा डाव १६० धावांवर संपुष्टात आला.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here