आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

तिनही फॉरमॅट मध्ये १०० सामने खेळणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटपटूने जाहीर केली निवृत्ती


न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. मार्च २००६ साली रॉसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

आता ३८व्या वर्षी त्याने निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. रॉसने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते आणि त्याच वर्षी पहिली टी-२० मॅच देखील खेळली होती. २००७ साली त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.

new google

रॉस टेलरने निवृत्ती संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या हिवाळ्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या लढतीनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी, ऑस्ट्रेलिया आणि नेडरलँडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. टेलर या मालिकेत न्यूझीलंड संघाकडून खेळणार आहे. गेल्या १७ वर्षापासून माझ्या करिअरमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आणि गर्वाची आहे.

रॉस टेलर हा जगातील एकमेव असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे ज्याने तिनही फॉर्मेटमध्ये १००हून अधिक सामने खेळले आहेत. न्यूझीलंडकडून त्याने ४४५ सामने खेळले आहेत. यात १८ हजार ०७४ धावा केल्या आहे. रॉसने ४० शतक झळकावली आहेत. या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रॉसने विजयी चौकार मारला होता. WTCचे विजेतेपद मिळवल्यानंतर रॉस निवृत्ती जाहीर करेल असे वाटले होते. पण तेव्हा निवृत्ती घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here