आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

सेलिब्रिटी क्रिकेटर च्या पुत्राची मुंबई रणजी संघात निवड महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्ध मुंबईचा रणजी संघ जाहीर


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याचा महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्धच्या मुंबई रणजी २० सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय संघासाठी खेळणाऱ्या पृथ्वी शाॅ याच्याकडे मुंबई रणजी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

अर्जुन तेंडूलकरची कामगिरी:

new google

मुंबई क्रिकेट असोसिएशन ने आयोजित केलेल्या पोलीस ढाल स्पर्धेत एमआयजी संघाकडून खेळताना उपांत्य सामन्यात पारसी जिमखान्याचे ४ गडी बाद करण्यात यश मिळवले होते तर शालिनी भालेकर करंडकात ६२ चेंडूत ८५ धावांचा रतीब घातला आहे. या खेळींच्या जोरावर अर्जुन तेंडूलकरने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

याच स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या अतिफ अत्तरवाला ची निवड होऊ शकलेली नाही. त्याने उपांत्य सामन्यात ४ तर अंतिम सामन्यात दोन डाव मिळून ६ गडी बाद केले. मात्र त्याचाच सहकारी रॉयस्टन डायस ची निवड रणजी सामन्यासाठी झाल्याचे दिसून येते.

मुंबई संघाने आतापर्यंत तब्बल ४१ वेळा रणजी चषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या वर्षीच्या चषकात मुंबई चा प्रथम सामना १३ जानेवारीला महाराष्ट्र विरोधात तर दुसरा सामना २० जानेवारी रोजी दिल्लीशी होणार आहे.

पहिल्या दोन सामन्यासाठी रणजी चषकासाठी मुंबईचा संघ:

पृथ्वी शाॅ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तारे (यष्टिरक्षक), हार्दिक तोमर (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, शशांक अटारडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बडीयानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडूलकर


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here