आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

‘जर विराट कोहली धोनीसारखा शांत असता तर…’; भारताच्या क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य…


अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भरपूर क्रिकेट खेळले आहे. नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून हरभजनने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता हरभजनने दोघांच्या नेतृत्वातील फरक सांगितला आहे.

हरभजन सिंग इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाला की, ‘ जर कोहली धोनीसारखा मवाळ असता, तर त्याने इतक्या धावा केल्या नसत्या. हे प्रत्यक्षात पूर्णपणे सत्य आहे आणि संघाला पुढे नेण्यासाठी आम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूंची संघात गरज आहे. जेव्हा संघ ऑस्ट्रेलियाला जायचा, तेव्हा कसोटी सामना कसा वाचवायचा असा विचार व्हायचा, पण विराटच्या नेतृत्वाखालील संघ कसोटी मालिका कशी जिंकता येईल, याचा विचार करून ऑस्ट्रेलियाला जातो.’
हरभजनने २०१४ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडलेड कसोटीत कोहलीने केलेल्या शतकाचे उदाहरण दिले. कसोटी अनिर्णित राखण्याऐवजी विजय किंवा पराभव हे दोन पर्याय कोहलीपुढे होते. कोहलीने हरभजनला सांगितले होते की, ‘भारतीय संघाने परदेशात विजय मिळवावा, असे मला वाटते. ड्रॉसाठी खेळणे माझ्यादृष्टीने काहीच महत्वाचे नाही.’

new google

हरभजन पुढे म्हणाला की, मला आठवते की, भारताने ती कसोटी मालिका गमावली होती. त्या सामन्यात भारताला ४०० धावांचे लक्ष्य गाठायचे होते आणि कोहलीने शतकी खेळी केली होती. जेव्हा तो पॅव्हेलियनमध्ये आला तेव्हा सामना अनिर्णित राहिला असता असे मी त्याला म्हटले. तेव्हा विराट म्हणाला की, एक कसोटी अनिर्णित राहिल्याने काही फरक पडत नाही. तुम्ही एकतर जिंका किंवा पराभूत व्हा. ज्या दिवशी आपण लढायला शिकू तेव्हा आपण जिंकू आणि कधीतरी हे आपण करू.’

हरभजनने धोनी आणि कोहली यांच्यातील दृष्टिकोनाची तुलना केली. तो म्हणाला की, ‘भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला आणि त्यांना दोन वेळा हरवले. इंग्लंडमध्येही चांगला खेळ केला आणि मला आशा आहे की, त्यांनी या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा. कोहलीने एक नेता म्हणून आपली भूमिका चोख बजावली आहे. आणि आक्रमक वृत्तीनेच विराट कोहली आज एक यशस्वी खेळाडू बनला आहे. तो धोनीसारखा मवाळ असता, तर त्याने इतक्या धावा केल्या असत्या, असे मला वाटत नाही.’


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here