आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

सेन्चुरियन कसोटी दोलायमान स्थितीत; भारताला विजयासाठी सहा विकेट्सची तर दक्षिण आफ्रिकेला २११ धावांची गरज


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारतचं पारड काहीसं जड असलं तरी आफ्रिका संघही दमदार झुंज देत आहे

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन मैदानात सुरु असलेला पहिल्या कसोटी सामना रंगतदार स्थितीत आला आहे. भारतीय संघ एका चांगल्या स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला असून भारताला विजयासाठी २११ धावांच आव्हान रोखताना ६ विकेट घ्यायचे आहेत. पण दक्षिण आफ्रिकेलाही २११ धावांचीच गरज असून त्यांचा कर्णधार एल्गर अर्धशतक पूर्ण करुन खेळत असल्याने तोही चांगल्या लयीत दिसून येत आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी चुरशीची लढाई दिसून येईल हे नक्की!

new google

भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला १७४ धावांत रोखले खरे; पण भारताला मिळालेल्या पहिल्या डावातील आघाडीमुळे दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ९४ अशी स्थिती झाली आहे.भारतीय संघ विजयापासून सहा विकेट लांब आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभवापासून केवळ कर्णधार डीन एल्गर आणि पाऊस वाचवू शकतो. अखेरच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुपरस्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर ही कसोटी सुरु आहे. कसोटीच्या चोथ्या दिवशीही गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. खेळपट्टीकडून चेंडूला असमान उसळी मिळत होती. याचा फायदा घेत कॅगिसो रबाडा, मार्को जॅन्सेन आणि लुंगी एन्गिडी यांनी अचूक मारा करून बुधवारी भारतीय फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. भारतीय फलंदाजांपैकी एकालाही ३४ धावांच्या पुढे खेळी करता आली नाही.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here