आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांत या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय..


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साह आहे. कारण भारतीय क्रिकेटमध्ये काही काळापासून कर्णधारपदावरून वाद निर्माण झाल्यानंतर, संघ मैदानावर कशी कामगिरी करतो हे सर्वांनाच पाहायचे आहे.

दक्षिण आफ्रिकेत काही काळापासून मैदानाबाहेर बरेच काही घडताना दिसत आहे. मात्र, दोन्ही संघांच्या खेळाडूंचे लक्ष या महत्त्वाच्या कसोटी मालिकेवर आहे, ज्यामध्ये प्रथमच भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय संघ यावेळी दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी होऊ शकतो, अशी आशाही सर्वांना आहे. आजच्या या लेखात  आम्ही तुम्हाला या मालिकेतील त्या पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर क्रीडाप्रेमींचे सर्वांत जास्त लक्ष असणार आहे.

 लोकेश राहुल (भारत): दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत प्रथमच लोकेश राहुल उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत लोकेश राहुलने दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर या दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे त्याच्या खांद्यावर आणखी जबाबदारी येणार आहे. राहुलने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 2 कसोटी सामने खेळले आहेत.

new google

 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 4 डावात 7.50 च्या सरासरीने केवळ 30 धावा केल्या आहेत. ज्याबद्दल तो यावेळी सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

 कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिका संघासाठी या मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने कागिसो रबाडाची गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एनरिक नॉर्खिया अनफिट असल्यामुळे या कसोटी मालिकेतून आधीच बाहेर पडला आहे. रबाडाच्या भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 9 सामन्यांत 29.17 च्या सरासरीने 24 बळी घेतले आहेत. रबाडाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळले असून 22.75 च्या सरासरीने 213 बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका

  शार्दुल ठाकूर (भारत): हार्दिक पांड्या टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर शार्दुल ठाकूर परदेश दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये संघासाठी वेगवान गोलंदाज अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. शार्दुलने ब्रिस्बेन कसोटी आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजीच्या जोरावर हा पराक्रम करून दाखवला आहे. आता आफ्रिकेत तो संघासाठी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो, तिथे त्याच्या स्विंग गोलंदाजीचीही खूप मदत होणार आहे.

 डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका): आफ्रिका संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर डीन एल्गरसाठी घरच्या मैदानावरील ही सर्वात मोठी कसोटी मालिका ठरणार आहे. आतापर्यंत तो सलामीवीर म्हणून खूप यशस्वी ठरला आहे. त्यानंतर एल्गरला कर्णधार म्हणून भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
एल्गरने आतापर्यंत भारताविरुद्धच्या 10 कसोटी सामन्यांमध्ये 33.88 च्या सरासरीने 576 धावा केल्या आहेत ज्यात 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहली (भारत): या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधारपदावरून झालेल्या गदारोळानंतर सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. आता कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या विराट कोहलीसाठी हा दौरा फलंदाजाच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 59.72 च्या सरासरीने 1075 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here