आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

संघ निवडीबाबत रवी शाश्त्री यांचं मोठं वक्तव्य, कर्णधार आणि कोच यांना मिळायला हवे हे अधिकार..


भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघ निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री यांचे मत आहे की, कोणत्याही दौऱ्यासाठी संघ निवडला जातो, तेव्हा त्यात कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या बाबीलाही महत्त्व दिले पाहिजे. नुकतेच निवड समितीने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रवी शास्त्रींचे हे वक्तव्य आले आहे.

शास्त्री आणि कोहली यांच्या जोडीने चमकदार कामगिरी केली आणि टीम इंडियाने काही ऐतिहासिक विजयांची नोंद केली. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात दोनदा पराभूत केले. त्याचवेळी, या वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत संघाने चांगली कामगिरी करत मालिका पुढे ढकलण्याआधी 2-1 अशी आघाडी घेतली.

new google

संघ निवडीबद्दल काय म्हणाले रवी शास्त्री?

दरम्यान, स्टार स्पोर्ट्स शोमध्ये संघ निवडीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटते की निवड प्रक्रियेत प्रशिक्षक आणि कर्णधाराला अधिक महत्त्व दिले पाहिजे. त्याची अधिकृत अंमलबजावणी व्हायला हवी. प्रशिक्षक जेव्हा अनुभवी असतो तेव्हा ते खूप महत्त्वाचे ठरते. मी होतो, राहुल द्रविड आहे आणि कर्णधारालाही बोलण्याचा अधिकार द्यायला हवा.

शास्त्री पुढे म्हणाले की, “विश्वचषकासाठी तीन यष्टीरक्षकांच्या निवडीशी मी सहमत नाही. एकतर अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर संघात येऊ शकले असते. महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना ठेवण्याचे कारण काय? मात्र मी कधीही निवडकर्त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मला माझे मत विचारले असता मी त्यांना माझे उत्तर दिले.

या विषयावर आपले मत मांडताना माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, “जेव्हा तुम्ही भारतीय संघ निवडता तेव्हा मला वाटते की निवडकर्त्यांचे म्हणणे अंतिम असते, परंतु ते नेहमीच कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांच्याशी चर्चेत असतात. जे काही निर्णय घेतले जातात, ते सर्वसाधारणपणे वैयक्तिक निर्णय नसून सामूहिक निर्णय बनतात.”


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here