आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आपल्या प्रेमासाठी हा ‘अवलिया’ चक्क सायकलवर सातासमुद्रापार पोहचला होता..


प्रेमासाठी केलेला त्याग किंवा ते प्रेम मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या गोष्टी आपण आजपर्यंत अनेक वेळा ऐकत आलोय. याची अनेक उदाहरणं देखील आपण आजूबाजूला पाहत असतोच. हल्ली प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही.
तुम्ही देखील अनेक रसिकांच्या किंवा प्रेमावीरांच्या कथा ऐकल्या असतील, पण आज युवाकट्टाच्या या विशेष लेखामध्ये एका विशेष प्रेमवीराची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी कदाचित तुम्ही ऐकली असेलही. कारण महानंदिया नामक या महाशयांनी आपले प्रेम मिळवण्यासाठी चक्क सात समुद्र पार केले होते  तेदेखील चक्क सायकलवरून तर मग त्याची चर्चा तर होणारच ना!

पीके महानंदिया हा एकमेव असा प्रियकर आहे जो रिकामा खिसा आन फक्त सायकल घेऊन आपलं प्रेम मिळवण्यासाठी सातासमुद्रापार निघाला होता. पीके महानंदियाबद्दल तुम्ही आजपर्यंत जास्त असं काय ऐकले नसेल, म्हणून तर आज आम्ही तुम्हाला त्यांची रंजक प्रेमकहाणी सांगनार आहोत.

महानंदियाचा जन्म भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी ओडिसा मध्ये झाला. त्याकाळी इंग्रजांपासून देश स्वतंत्र झाला होता पण दोन्ही देशामधील अंतर्गत समस्या तेव्ह चव्हाट्यावर आल्या होत्या. यातील सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे ‘जातीयवाद’. महानंदिया ओडिसातील एका छोट्या गावात राहत होता, जिथे लोक एकमेकांच्या जातीची खूप काळजी घेत असत. महानंदियाचा जन्म एका छोट्या जातीत म्हणजे दलित कुटुंबात झाला होता. पण त्या काळी महानंदियाला दलित समाजात जन्म घेतल्यामुळे मोठी किंमत मोजावी लागली.

लहानपणापासूनच त्याने जातीय भेदभाव अनुभवला होता. त्याची खरी सुरुवात शालेय जीवनापासून झाली. दलित असल्याने त्याला शाळेत सर्वांपासून दूर ठेवण्यात आल्याचे समजते. त्याला कोणालाही किंवा कशालाही हात लावण्याची परवानगी नव्हती. एवढेच नाही तर दलित असल्या कारणाने त्याला वर्गात मागच्या बाजूला आणि जमिनीवर बसवले जायचे. हे सर्व पाहून महानंदिया अनेकदा खूप दुःखी होत असे.

प्रेम

अशा परिस्थितीत त्याची आई त्याला एकच गोष्ट सांगायची, जी ऐकून तो आशेने भरून जायचा.

त्याची आई त्याला सांगायची की एका भविष्यवाणीनुसार, तो बाकीच्यांसारखा कधीच लग्न करणार नाही. त्याची आई सांगायची की त्याची बायको दूरच्या ठिकाणाहून येईल आणि तिची राशी वृषभ असेल. ती मुलगी संगीत वाजवत असेल आणि एक जंगलही तिच्या मालकीचे असेल. आईचे हे शब्द महानंदियाला खरे वाटले आणि ती गोष्ट मनात ठेऊनच तो मोठा झाला. जीवनात त्याने अनेक संकटांचा सामना केला, पण चांगल्या भविष्याच्या विचारात तो प्रत्येक दु:ख सहन करत राहिला.

जीवनातील सर्व अडचणींपासून दूर जाण्यासाठी महानंदियाने कलेचा आधार घेतला. तो रंगात इतका हरवून गेला होता की तो प्रसिद्ध चित्रकार केव्हा झाला ते कळलेही नाही. तो प्रसिद्ध जरूर झाला,पण श्रीमंत नाही. त्याच्याकडे पैशांची कमतरता होती, त्यामुळे चित्रकारीच्या काळातही त्याने खूप कठीण प्रसंग पाहिले. तो दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये चित्रे काढायचा. तिथे त्याने अनेक वेळा मोठ्या नेत्यांची चित्रे काढली होती. त्यामुळे त्याचे नाव थोडे प्रसिद्ध झाले. त्यावेळी महानंदिया असा दावा करायचा की तो केवळ 10 मिनिटांत कोणाचेही स्केच काढू शकतो.

ते वर्ष होतं 1975 चं आणि दिल्लीत नेमकाच हिवाळा सुरू झाला होता. असे मानले जाते की त्यावेळी अनेक परदेशी पर्यटक दिल्लीला भेट द्यायला येत असत. त्यापैकी एक होती ती स्वीडनची ‘शार्लोट वॉन’. शार्लोट वॉनने लहानपणापासूनच भारताविषयी ऐकले होते आणि तिला नेहमीच येथे भेट देण्याची इच्छा होती असे म्हटले जाते. ती एके दिवशी तिच्या भारत दर्शनादरम्यान दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधून जात होती. तिथे एका चित्रकाराकडून 10 मिनिटांत स्केच बनवण्याबद्दल ऐकले आणि  तिने विचार केला की एकदा प्रयत्न का करू नये!

महानंदियाने शार्लोटचे स्केच 10 मिनिटांत बनवले पण तिला ते आवडले नाही. तिने त्याला दुसरी संधी दिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येईन असे सांगितले. महानंदियाचे नशीब दुसऱ्या दिवशीही विशेष नव्हते. पुन्हा शार्लोटला स्केच आवडले नाही. शार्लोटला स्केच आवडले नसेल, पण दुसरीकडे महानंदियाला शार्लोट नक्कीच आवडली होती. त्याला पहिल्या नजरेतच जाणवलं की शार्लोट तीच मुलगी होती जिच्याबद्दल त्याची आई बोलायची.

जेव्हा त्याने शार्लोटला काही प्रश्न विचारले, तेव्हा त्यांची उत्तरे ऐकून तो स्वत: थक्क झाला. शार्लोट दूर स्वीडनहून आली होती. तिच्या कुटुंबात जवळच एक जंगल होते आणि ती संगीतही वाजवत असे. एवढेच नाही तर तिची राशीही वृषभ होती. हे सर्व ऐकून महानंदियाने मनाशी ठरवून टाकले की, काहीही झाले तरी तो या मुलीशीच लग्न करेल.

त्या दिवसानंतर महानंदिया आणि शार्लोट काही काळ भेटत राहिले. शार्लोटला भारतात फिरायचे होते आणि महानंदियाने तिला आपल्या गावात जायला सांगितले. तोपर्यंत दोघांच्याही हृदयात प्रेमाची ज्योत पेटली होती. यानंतर दोघे गावात इतके जवळ आले की हे प्रकरण लग्नावरच संपले. महानंदियाच्या रितीरिवाजांनुसार दोघांनी लग्न केले. सुमारे तीन आठवडे दोघेही प्रेमात बुडाले होते, पण त्यानंतर त्यांना सत्याला सामोरे जावे लागले. तीन आठवड्यांनंतर शार्लोट स्वीडनला परतणार होती. महानंदिया तिच्यासोबत जाऊ शकला नाही कारण त्याला कॉलेज पूर्ण करायचे होते आणि स्वतःच्या पैशाने स्वीडनला जायचे होते.

अनेक प्रयत्न करूनही महानंदियाला विमानाच्या तिकीटाची व्यवस्था करता आली नाही. यानंतर त्याने सायकलवरून स्वीडनला जाण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने आपले सर्वकाही विकले आणि एक सायकल विकत घेतली. त्याच्या खिशात फक्त काहीसे पैसे आणि त्यासोबत एक सायकल होती.याच सामग्रीच्या आधारे त्याला एवढा लांबचा प्रवास पूर्ण करायचा होता.

22 जानेवारी 1977 रोजी त्याचा हा सायकल प्रवास सुरू झाला. स्वीडनला वेळेवर पोहोचता यावे म्हणून दिवसाला सुमारे ७० किलोमीटर सायकल चालवावी लागेल असा विचार त्याने केला होता. या प्रवासात त्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान अशा अनेक देशांमधून युरोप गाठायचे होते.

त्यानंतर त्याने प्रवास सुरू केला. या कामात त्याच नशीबही त्याला साथ देत होते. तो वाटेतल्या लोकांची चित्रे काढायचा जेणेकरून त्याला पैसे, अन्न किंवा राहण्यासाठी जागा मिळेल अशा प्रकारे तो पुढे जात राहिला. सायकल चालवताना महानंदियाच्या पायाला फोड आले, पण त्यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही. आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी तो काहीही करू शकत होता.

महानंदियाने संपूर्ण वेळ सायकल न चालवता अनेक ठिकाणी त्याने ट्रकचालकांकडून लिफ्टही घेतल्या. त्यामुळे त्याचा प्रवास थोडा सोपा झाला. सुमारे पाच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर महानंदिया स्वीडनमधील शार्लोटच्या घरी पोहोचू शकला. इथे पोहोचताच तो शार्लोटला भेटला तेव्हा दोघांचेही मन भरून आले. दोघांचे शरीर जरी एकमेकांपासून वेगळे असले तरी त्यांची हृदये एकमेकांच्या जवळ होती.

यानंतर दोघांनी पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधली आणि कायमचे एकमेकांसोबत राहिले. त्या दिवसापासून आजतागायत दोघेही एकमेकांसोबत आनंदाने हसत खेळत आहेत आणि आनंदी जीवन जगत आहेत.

महानंदिया आणि शार्लोटची प्रेमकथा खरोखरच रंजक आहे. अनेक महिने सायकल चालवून आपले प्रेम शोधणे खरोखरच खूप अवघड काम आहे . त्यामुळेच आज या दोघांची ही कहाणी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. अशा तरही अनेक प्रेमकथा आहेत ज्या त्यांच्या वेगळेपणामुळे जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here