आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

आयसीसीनं पुरस्कारासाठी जाहीर केली ‘ही’ 4 नावं; गेल्या 12 महिन्यांत क्रिकेटच्या मैदानावर अनेक खेळाडूंची ‘शानदार’ कामगिरी पाहायला मिळाली.


आयसीसीनं ज्या चार खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यात इंग्लंडचा जोस बटलर (Jose Butler), श्रीलंकेचा वानिंदू हसारंगा, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. या चार खेळाडूंमधून वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 खेळाडूची घोषणा केली जाणार आहे.

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानसाठी हे वर्ष खूपच चांगलं गेलंय. टी-20 विश्वचषक असो किंवा कोणतीही द्विपक्षीय मालिका.. मोहम्मद रिझवानची बॅट चांगलीच तळपली. मोहम्मदनं यावर्षी खेळल्या गेलेल्या 29 सामन्यांत 1326 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 70 पेक्षा जास्त आहे.

new google

श्रीलंकन ​​क्रिकेटमध्ये खळबळ माजवणारा वानिंदू हसारंगाही यंदा हा पुरस्कार पटकावण्याचा दावेदार ठरलाय. त्यानं यावर्षी एकूण 20 सामने खेळले आणि 36 विकेट घेतल्या आहेत. हसारंगानं केवळ चेंडूनेच नव्हे, तर बॅटनंही चांगली कामगिरी केलीय. यात अर्धशतक आणि काही लहान डावांचा समावेश आहे. हसारंगानं यंदा हॅटट्रीकही साधलीय.

T20 विश्वचषकातील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा ‘हिरो’ ठरलेल्या मिचेल मार्शनं यंदाही 627 धावा केल्या आणि आठ विकेट्सही घेतल्या. टी-20 संघात तिसऱ्या क्रमांकावर येणं मार्शसाठी गेम चेंजर ठरत आहे. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरही आयसीसी पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहे, त्यानं यावर्षी शतक झळकावलं आणि एकूण 589 धावा केल्या आहेत.

दरम्यान, वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 खेळाडूच्या नामांकनामध्ये कोणत्याही भारतीयाचं नाव नाही, परंतु भारताच्या रविचंद्रन अश्विनला वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूमध्ये नामांकन मिळालंय.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here