आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

आशिया कप: भारतीय यंग ब्रिगेड अंतिम सामन्यात दाखल; या संघाशी होणार मुकाबला


अंडर-१९ आशिया चषकाच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने १०३ धावांनी विजय मिळवत आशिया कपच्या अंतिम सामना गाठण्यात यश मिळवले आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या शेख रशीद ने केलेल्या नाबाद ९० धावांच्या जोरावर भारताने ते लीलया पेलले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटके खेळून ८ गडी गमावत २४३ धावांचे लक्ष्य  बांगलादेशच्या संघासमोर ठेवले.

मात्र हे लक्ष्य गाठताना बांगलादेश संघाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पहिल्या ५० धावा करतानाच बांगलादेशला ४ गडी गमवावे लागले. बांगलादेश कडून अरिफुल इस्लाम ने केलेल्या सर्वाधिक ४२ धावा वगळता कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.बांगलादेशचा संपूर्ण संघ केवळ ३८.२ षटकात १४० धावा करत सर्वबाद झाला.

new google

भारतीय गोलंदाजांमध्ये राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार, राज बावा आणि विकी ओसवाल यांना प्रत्येकी २ गडी बाद करण्यात यश मिळाले तर निशांत संधू आणि कौशल तांबे यांनी एक-एक गडी बाद करत विजयात मोलाची साथ दिली. तर बांगलादेशसाठी रकिबुल हसनला सर्वाधिक ३ गडी बाद करता आले. तर शाकीब, रोहमन, मेहरूब आणि अरीफूल ने प्रत्येकी एक गडी बाद केला.

आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने २२ धावांनी पाकिस्तान संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी 31 डिसेंबर रोजी दुबई येथील मैदानावर खेळवण्यात येईल.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here