आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज म्हणतो, “मला माझ्या आयुष्यात ही ५५ मिनिटे परत कधीच बघायची इच्छा नाही”


ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ गुरुवारी मेलबर्नमधील हॉटेलमध्ये लिफ्टमध्ये अडकला होता. सुमारे तासभर तो लिफ्टमध्ये अडकलेला होता. परंतु सुदैवाने मोठा अपघात टळला. स्मिथसोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यादरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि त्याचा सहकारी फलंदाज मार्नस लॅबुशेन यांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी या घटनेचे इंस्टाग्रामवर ‘लाईव्ह-स्ट्रीम’ केले. त्याच वेळी, लॅबुशेनने रॉडच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि स्मिथला काही चॉकलेट खायला दिले.

new google

सुमारे ५५ मिनिटे वाट पाहिल्यानंतर तंत्रज्ञ हॉटेलमध्ये आले तेव्हा स्मिथला त्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. स्मिथने इंस्टाग्रामवर एका व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी सध्या लिफ्टमध्ये अडकलो आहे, पण दरवाजे उघडत नाहीत. कदाचित ते आउट ऑफ सर्विस आहे आणि कार्यरत नाही.”

व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणतो की, “मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मी ते एका बाजूने थोडेसे उघडले आहे, मार्नस (लाबुशेन) दुसर्‍या बाजूने ते उघडण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचा काही उपयोग झाला नाही. मार्नसने माझ्यासाठी काही खायलाही दिले आहे.”

स्मिथ पुढे म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी संध्याकाळची ज्या प्रकारे कल्पना केली होती, तशी ती नव्हती. सध्या मी सुरक्षित खोलीत पोहोचलो आहे. शेवटी लिफ्टमधून बाहेर पडलो. हा नक्कीच एक वेगळा अनुभव होता. मला माझ्या आयुष्यात ही ५५ मिनिटे परत कधीच बघायची इच्छा नाही.”

https://www.instagram.com/reel/CYG4LN8hZDT/?utm_medium=copy_link

सात क्रिकेटरने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘स्टीव्ह स्मिथ लिफ्टमध्ये अडकलेल्या घटनेचा व्हिडिओ’ असे लिहिलेले आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here