आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

द.आफ्रिकेचा रडीचा डाव; विराटला माहिती होती त्या एका ओव्हरची किमत, अंपायर्सशी घातला वाद


कसोटी क्रिकेटमध्ये वेळ फार महत्त्वाचा असतो. अनेकदा असे होते की थोडा वेळ देखील वाचवणे हे सामन्याचा निकाल बदलणारे ठरू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेळ किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी कर्णधार किती धडपडतो हे पाहायला मिळाले.

भारताचा दुसरा डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरूवात केली. दिवसाचा खेल संपत असताना आफ्रिकेने ३ गडी गमावले होते. त्याचा प्रयत्न कसे तरी करून एक ओव्हर कमी खेळण्याचा होता. या उटल भारताचा कर्णधार विराट कोहलीची इच्छा होती की भारताला एक ओव्हर गोलंदाजी करण्यास मिळावी.

new google

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू डीन एल्गर आणि केशव महाराज वेळ काढण्याचा प्रयत्न करत होत, यावर विराट कोहली नाराज झाल्याचे दिसले. त्याने मैदानावरील अंपायरशी बोललेले स्टंप माइकच्या माध्यमातून सर्वांना ऐकू आले.

रूल बुकमध्ये स्पष्टपणे लिहले आहे की, तुम्ही खेळ संपण्याच्या १० मिनिटे आधी ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकत नाही. कोहलीने ही गोष्ट एल्गर याला देखील सांगितली. त्यानंतर एल्गरने एक छोटा ड्रिंक्स ब्रेक घेतला. एल्गरने दिवसाचा खेळ संपण्याचा दोन ओव्हर आधी ब्रेक घेतला. त्यानंतर अंपायर माराइस इसेरमस यांनी देखील म्हटले की, आम्ही अंपायरिंग करणार, ड्रिक्स ब्रेक साठी १० मिनिटे शिल्लक आहेत.

विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली . भारताने आफ्रिकेवर ११३ धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला १९१ धावांवर रोखले. यासह भारताने विजय साकारला.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here