आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

भारताविरुद्ध पराभव जिव्हारी; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुने घेतली निवृत्ती


दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताने सेंच्युरिनवर दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ धावांनी पराभव करत मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. सेंच्युरियनवर झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मात्र डी कॉकचा हा निर्णय कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नव्हता, याचा निर्णय क्विंटन डी कॉकने आधीच केला होता.

डी कॉकने त्याच्या निवेदनात म्हटलं की, सहज घेतलेला हा निर्णय नाही. निर्णयानंतर माझं भविष्य कसं असेल याचा विचार करण्यासाठी बराच वेळ मी घेतला. आता माझ्या जीवनात कशाला प्राधान्य असायला हवं? आमच्या पहिल्या अपत्याचं स्वागत आम्ही करणार आहे आणि त्याचं पालन पोषण करायचं आहे. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि माझ्या या नव्या इनिंगसाठी मला पुरेसा वेळ हवा आहे.

new google

मला कसोटी क्रिकेट आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणं आवडतं. मी अनेक चढ-उतार पाहिले आणि जल्लोष, निराशा यांचाही अनुभव घेतला. मात्र मला आता असं काही मिळालं आहे ज्यावर मी आणखी प्रेम करतो असंही डी कॉकने म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत मिळवला चौथा विजय

सेंच्युरीयनच्या मैदानावर ११३ धावांनी मिळवलेला विजय हा भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत मिळवलेला चौथा विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१८ मध्ये जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात ६३ धावांनी विजय मिळवला होता. तर २०१० मध्ये डर्बनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ८७ धावांनी विजय मिळवला होता. तसेच २००६ मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १२३ धावांनी सामना आपल्या नावावर केला होता. ( Indian team became first team to win test match at Centurion)

 

दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने मिळवलेले विजय

११३ धावा : सेंच्युरियन २०२१*

६३ धावा : जोहान्सबर्ग, २०१८

८७ धावा : डर्बन , २०१०

१२३ धावा : जोहान्सबर्ग, २००६


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here