आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

विराट कोहलीसाठी २०२१ हे वर्ष ठरलं बॅडलक


भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी यंदाचे वर्ष संघर्षमय राहिले. यावर्षीही त्याच्या भात्यातून एकही शतक पाहायला मिळाले नाही. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी केली. एवढेच नाही तर पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची संधीही त्याने गमावली.

सेंच्युरियनच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरु आहे. या वर्षातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना आहे. पहिल्या डावात ३५ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात तरी कोहलीची बॅट तळपणार का? याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष्य होते. पण कोहलीने पुन्हा निराश केले. दुसऱ्या डावात त्याने जर्सी मागे असलेल्या नंबर एवढ्या १८ धावाच केल्या. विराट कोहलीने २०१९ मध्ये बांगालदेश विरुद्ध अखेरचं शतक झळकावले आहे. तेव्हापासून त्याला नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही.

new google

विराट कोहलीसाठी हे २०२१ वर्ष खूपच वाईट गेले. याच वर्षी त्याने टी-20 संघाचं नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या नेतृत्वही गमवावे लागले. यावर्षी मार्च २०२१ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली. या मालिकेत कोहलीने ११५.५० च्या सरासरीसह १४७.१३ च्या स्ट्राइक रेटनं २३१ धावा केल्या. यात त्याने तीन अर्धशतके झळकावली.

टी-20 वर्ल्ड कप २०२१ च्या स्पर्धेत विराट कोहलीने पाच सामन्यातील तीन डावात ३४ च्या सरासरीने ६८ धावा केल्या. टी20 वर्ल्डकप मधील पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ४९ चेंडूत ५७ धावा केल्या. न्यूझीलंड विरुद्ध १७ चेंडूत ९ धावा केल्या होत्या. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात कोहलीने २ चेंडूत नाबाद २ धावांची खेळी केली होती. अफगाणिस्तान आणि नामिबिया विरुद्ध त्याच्यावर बॅटिंगची वेळच आली नव्हती.

विराट कोहलीने या वर्षात केवळ तीन वनडे सामने खेळले. पुण्यात झालेल्या तीन सामन्यात मिळून कोहलीने १२९ धावा केल्या होत्या. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे त्याला श्रीलंका दौऱ्याला मुकावे लागले.

या वर्षात विराट कोहलीने ११ कसोटी सामन्यात १९ वेळा बॅटिंग केली. यात त्याने २८.२१ च्या सरासरीसह ४४.०७ च्या स्ट्राइक रेटनं ५३६ धावा केल्या. चार अर्धशतकामध्ये त्याची ७२ ही सर्वोच्च धावसंख्या राहिली.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here