आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

सेंचुरियन कसोटीनंतर ट्विटर वर अशाप्रकारे व्यक्त झाला भारतीय संघ


टीम इंडियाने आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर ११३ धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला १९१ धावांवर रोखले. यासह भारताने विजय साकारला. केएलने एकूण २६० चेंडूत १३० धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला. सुनील गावसकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी यासारख्या दिग्गजांनी टीम इंडियाचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं. मात्र आतापर्यंत यााधी कधीही टीम इंडियाला सेंचुरियनमध्ये (Centurion) विजय मिळवता आला नव्हता. मात्र टीम इंडियाने कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातच ही किमया करुन दाखवली. टीम इंडियाने याआधी सेंचुरियनमध्ये २ कसोटी सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. उपकर्णधार सलामीवीर केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. केएलने सामन्यातील पहिल्या डावात शतक ठोकलं. केएलने एकूण २६० चेंडूत १३० धावांची खेळी केली. तर शमीने आफ्रिकेच्या पहिल्या डावात ५ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विजयानंतर भारतीय खेळाडू ट्विटर वर अशाप्रकारे व्यक्त झाले.

new google

पाचव्या दिवशी भारताने दक्षिण अफ्रिकेचे ६ गडी झटपट बाद केले. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ३, मोहम्मद शमीने ३, मोहम्मद सिराजने २ आणि आर. अश्विनने २ गडी बाद केले. दक्षिण अफ्रिकेच्या सेंच्युरिअन मैदानात भारताने पहिला कसोटी विजय मिळवला आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. मात्र एल्गर ७७ धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला.

मल्डरने ३ चेंडूत अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन १३ धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपलं खातंही उघडता आलं नाही. अवघ्या ४ धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here