आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

“पापा, तुम्ही आम्हाला सोडून तीन वर्षे झाली.” वडिलांच्या आठवणीत राशिद खान झाला भावुक, ट्विटरवर व्यक्त केल्या अश्या भावना..


अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खान त्याच्या फिरकीसाठी जगभरात ओळखला जातो, आजकाल रशीद बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालत आहे, पण याच दरम्यान तो सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळाला.वडिलांची आठवण काढत राशिदने एक भावूक ट्विट करत आपल्या भावनांना मार्ग मोकळा केला आहे.

आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत अफगाणिस्तानच्या या अनुभवी गोलंदाजाने लिहिले, “पापा, तुम्ही आम्हाला सोडून तीन वर्षे झाली. मला माहित आहे की प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे आणि हे जीवनातील कटू सत्य आहे, परंतु मी स्वतःला सांत्वन देऊ शकत नाही. तुम्ही कायमचे निघून गेल्याचा विचार करून माझ्या डोळ्यात अश्रू येतात.

new google

रशिद खान

वास्तविक राशिद खान त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा होता आणि त्याच्यावर खूप प्रेम करत होता. आज तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आज त्यांना हे जग सोडून तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच रशीदला आज आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्याने हे भावनिक ट्विट केले.

रशीद सध्या अॅडलेड स्ट्रायकर्सकडून बिग बॅश लीग खेळत आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 7.12 च्या इकॉनॉमीने 10 विकेट घेतल्या आहेत. अॅडलेडच्या संघाला या स्पर्धेत आतापर्यंत फारशी कामगिरी करता आली नसली, तरी त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here