आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

U19 Asia Cup 2021: या पाच खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारत बनला एशियाचा चॅम्पियन..


दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने विजय मिळवला. टीम इंडियाने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा 9 विकेट राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ केवळ 106 धावा करू शकला. पावसाने प्रभावित झालेला हा सामना ३८-३८ षटकांचा होता आणि टीम इंडियाला विजयासाठी १०२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे भारतीय संघाने 22 व्या षटकात आंक्रिश रघुवंशी आणि शेख रशीद यांच्या उत्कृष्ट अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर गाठले

भारताने सलग तिसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषक जिंकला आहे, तर संघाने एकूण 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताच्या या विजयात महत्वाची कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूबद्दल जाणून घेऊया.

new google

भारताला चॅम्पियन बनवण्यात उजव्या हाताचा फलंदाज शेख रशीदचा सर्वात मोठा हात होता. या 17 वर्षीय फलंदाजाने या स्पर्धेत सर्वाधिक 133 धावा केल्या. रशीदची सरासरी ६६.५० असून चारपैकी दोन डावात तो नाबाद राहिला. शेख रशीदने या स्पर्धेत केवळ 6 चौकार आणि 1 षटकार मारला पण त्याने कठीण विकेट्सवर फलंदाजी करत सर्वाधिक योगदान दिले.

भारत

भारताला चॅम्पियन बनवण्यात सलामीवीर हरनूर सिंगनेही महत्त्वाचे योगदान दिले. हरनूरने 4 सामन्यात 131 धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. हरनूरची सरासरी 32.75 होती पण त्याने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली.

टीम इंडियासाठी अंतिम सामन्यात अंगकृश रघुवंशीने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 56 धावा करत श्रीलंकेचे भक्कम गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त केले. रघुवंशीने 35.66 च्या सरासरीने एकूण 107 धावा केल्या.

गोलंदाजीत उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज राज अंगद बावाने भारताकडून 4 सामन्यात 8 विकेट घेतल्या. बावाने एका सामन्यात चार विकेट घेण्याचा पराक्रमही केला.

भारताच्या विजयात डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवालने महत्त्वाची भूमिका बजावली. ओस्तवालने 4 सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 2.50 होता. अंतिम फेरीत ओस्तवालने 3 बळी घेत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here