आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) गमावल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका होत आहे.


अ‍ॅशेस मालिका गमावल्यानंतर अँडरसनचं ECB कडे बोट, बोर्डाकडे केली मोठी मागणी

अ‍ॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघावर जोरदार टीका होत आहे. या मालिकेमधील २ कसोटी सामने अद्याप बाकी आहेत. त्यापूर्वीच इंग्लंडनं ही मालिका गमावली आहे. तीनही कसोटीमध्ये इंग्लंडनं निराशाजनक खेळ करत ही मालिका गमावली आहे. या पराभवानंतर इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याने देशाच्या क्रिकेट बोर्डाकडे (ECB) बोट दाखवलं आहे.

new google

मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं काऊंटी चॅम्पियनशिप क्रिकेटच्या दर्जावर टीका केली होती. तसंच देशात चांगले क्रिकेटपटू तयार होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले होते. रूटच्या या मागणीला अँडरसननं देखील पाठिंबा दिला आहे.

अँडरसननं ‘क्रिकइन्फो’ शी बोलताना सांगितले की, ‘काऊंटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना शिकण्याची संधी मिळते. पण तरूण खेळाडूंना सध्या अवघड परिस्थितीत खेळ सुधारण्याचे प्रशिक्षण मिळत नाही. २०१५ साली व्हाईट बॉल क्रिकेटला प्राधान्य मिळाले. त्यानंतर या खेळाचा दर्जा सुधारला. आता रेड बॉल क्रिकेटला प्राधान्य देण्याची गरज आहे.

माझ्या मते २०१५ साली झालेल्या विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटला मोठे प्राधान्य देण्यात आले. लिमिटेड ओव्हर्स आणि टेस्ट क्रिकेटमधील संतुलन हळू-हळू योग्य होत आहे. पण, अजुनही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटला प्राधान्य आहे. गेल्या काही वर्षात टेस्ट क्रिकेटमधील आमची कामगिरी नियमित नाही. या कामगिरीचा विचार केला तर हे संतुलन आणखी योग्य करता येईल.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here