आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

नव्या वर्षीच्या सुरुवातीच्या पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडनं केली दमदार सुरूवात


न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्याने नव्या वर्षाची सुरूवात झाली. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यजमान न्यूझीलंडनं दमदार सुरूवात केली आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे  (Devon Conway) याने २०२२ मध्ये पहिले शतक झळकावले आहे. कॉनवेचं कसोटी कारकिर्दीमधील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्यानं लॉर्ड्स कसोटीमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. कर्णधार टॉम १ धाव काढून बाद झाला. आघाडीचा खेळाडू आणि मुख्य कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये लॅथम या कसोटी मालिकेमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार आहे. तो बाद झाल्यानंतर कॉनवेनं विल यंगसोबत डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी केली. यंग अर्धशतकानंतर लगेच ५२धावा करून बाद झाला.

new google

कॉनवेनं १८६ चेंडूमध्ये १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं शतक पूर्ण केले. कॉनवेनं त्याच्या कसोटी कारकिर्दीमधील ७ व्या डावामध्ये दुसरं शतक झळकावले. त्यानं ३ अर्धशतक देखील झळकावले आहेत. कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडची पहिल्या कसोटीमधील स्थिती भक्कम झाली आहे.

 

कॉनवेनं यापूर्वी लॉर्ड्स कसोटीमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे पहिला क्रिकेटपटू आहे. इंग्लंडमध्ये जून महिन्यात झालेल्या कसोटी मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. पदार्पणाच्या कसोटी मध्येच द्विशतक करणारा कॉनवे हा सहावा क्रिकेटपटू आहे.

कॉनवेने या सामन्यात १२५ वर्ष जुना विक्रमही तोडला आहे. याआधी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रणजीतसिंगजी यांच्या नावावर होता. रणजीतसिंगजी यांनी १८९६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये १५४ धावांची नाबाद खेळी केली होती.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here